कपिल शर्माच्या ट्विटमुले भाजपाला वाचवण्याचा पालिकेचा प्रयत्न - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कपिल शर्माच्या ट्विटमुले भाजपाला वाचवण्याचा पालिकेचा प्रयत्न

Share This
मुंबई / प्रतिनिधी - कॉमेडीयन कपिल शर्मा यांनी पलिकेच्या अधिकाऱ्यानी लाच मागितल्याचे व भाजपाचे हेच का अच्छे दिन असे ट्विट केल्याने भाजपाच्या अडचणीत येण्याची शक्यता असल्याने भाजपाला वाचवण्यासाठी पालिकेने कंबर कसली असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
कॉमेडीयन कपिल शर्मा यांनी अँधेरी येथील घरामागील जागेत अनधिकृत बांधकाम केले होते. याला पालिकेने ऑगस्ट मधे नोटिस दिली होती. यानंतर ऑगस्टमधेच हे अनधिकृत बांधकाम तोडले होते. हा प्रकार पालिकेने किंवा कपिल शर्मा यांनी उघड केला नव्हता. मात्र अचानक कपिल यांनी आज शुक्रवारी ट्विट वरून पालिका अधिकारी बांधकामाबद्दल 5 लाख रूपये लाच मागत असल्याचा आरोप केला आहे. हे ट्विट कपिल यांनी मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री याना केले होते. याच ट्विटमधे कपिल यांनी हेच का अच्छे दिन असा प्रश्न उपस्थित केल्याने मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिल्यास कारवाई करण्याचे ट्विट करून म्हटले आहे.

यानंतर पालिकेने कोणतीही लेखी तक्रार आली नसताना पालिकेने याची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत कपिल यांनी लाच कोणी मागितली आणि कुठल्या कामासाठी लाच मागितली याचा तपशील द्यावी असे आवाहन पालिकेचे दक्षता विभागाचे प्रमुख अभियंता मनोहर पवार यांनी केले. याच वेळी कपिल यांना वाटल्यास लाचखोर अधिकाऱ्याचे नाव गुप्त ठेवायचे असल्यास नाव गुप्त ठेवले जाईल असे पवार यांनी सांगीतले. यावरून भाजपाची सत्ता असलेल्या महापालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप झाल्याने आणि हे प्रकरण थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत पोहचल्याने पालिका खडबडून जागी होउन कारवाई करत आहे.

या प्रकरणात सोशल मिडियामधील ट्वीटरवरील तक्रारीवरुन कारवाई करताना पालिकेने अद्याप कधीही अशी कारवाई केली नसल्याने एका सेलीब्रेटीसाठी कारवाई करताना दिसत आहे. याचवेळी पालिकेकड़े सामान्य लोकांच्या हजारो तक्रारी धुळखात पडल्या असताना पालिकेकड़े कोणतीही तक्रार आली नसताना पालिकेने कारवाई करण्यास पुढाकार घेतला आहे. भाजपावर हेच का अच्छे दिन असा आरोप झाल्याने भाजपाची बिघडलेली छबी सुधारण्यासाठी पालिका प्रशासन कामाला लागले आहे.

कपिलच्या विरोधात तक्रारकपिल शर्मा यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केल्या नंतर भाजपा आमदार राम कदम यांनी सायबर क्राइमकड़े तक्रार दिली आहे. ही तक्रार लाच लुचपत विभागाकड़े वर्ग करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

शिवसेना मनसे कपिलच्या विरोधातकपिल शर्मा यांच्या तक्रारी नंतर शिवसेना आणि मनसेने त्याच्या विरोधात उभी राहिली आहे. कपिल याचे बांधकाम अनधिकृत होते. काम थांबवण्यास नोटिस दिल्या नंतरही त्याने बांधकाम केले असे तृष्णा विश्वासराव यांनी म्हटले आहे. तर मनसेने लाच मागीतल्याचे पुरावे कपिलने सादर करावे,लाच घेतली असल्यास किंवा मागितली असल्यास भ्रष्ट अधिकाऱ्यावरही कारवाई करावी असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

जगातील भ्रष्ट पालिका मुंबईमुंबई महानगरपालिकेवर शिवसेना भाजपाची सत्ता आहे. पालिकेत पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही. जगातील सर्वात भ्रष्ट मुंबई महापालिका आहे असा आरोप कोंग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages