मुंबई - २००० कोटी रुपयांच्या अंमली पदार्थ प्रकरणी ठाणे पोलिसांनी आपलं नाव विनाकारण गोवलं आहे. याप्रकरणी मी पूर्णत: निर्दोष आहे, असे सांगत पूर्वाश्रमीची बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने शुक्रवारी आपल्यावरील आरोपांचं खंडन केले आहे.
‘‘मी भारतीय राज्यघटनेच्या तत्वाविरोधात कोणतेही कृत्य केलेले नसून, मी ठाणे पोलिस आणि अमेरिकेच्या ‘ड्रग एन्फोर्समेन्ट ऍडमिनिस्ट्रेशन’ या अंमलीपदार्थविरोधी संस्थेच्या उच्चपदस्थ, हीन आणि अनैतिक कटाची बळी ठरली आहे”. गेल्या वीस वर्षांपासून मी विरक्त जीवन व्यतित करत आहे. पैसा, संपत्ती, ऐषोआराम या भौतिक सुखाच्या पलिकडे माझं जीवन गेलं आहे. असं असताना अचानक ठाणे पोलिसांनी माझं या अंमली पदार्थाच्या खटल्यात नाव का गोवलं आहे हे माझ्या कल्पनाशक्तीपलिकडचं आहे. ठाणे पोलिस २००० कोटी रुपयांच्या व्यवहाराविषयी बोलतात. पण माझ्या बॅंक अकाऊंटमध्ये फक्त २५ लाख रुपये आहेत. जे मी चित्रपट क्षेत्रात कार्यरत असताना कमाविले आहेत. मी कधीच कोणतीही गोष्ट लपविलेली नाही. माझं आयुष्य सूर्यप्रकाशाइतकंच स्वच्छ आहे. या कटातून तो भगवंत मला सुखरुप बाहेर काढेल असा मला पूर्ण आत्मविश्वास आहे, अशी बाजू ममता कुलकर्णीने उपस्थित पत्रकारांशी चित्रफितीद्वारे संवाद साधताना मांडली.
अशाच प्रकारे आपली भूमिका सविस्तरपणे तिने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांना लिहीलेल्या पत्रात स्पष्ट केली आहे. ममता कुलकर्णी सध्या केनियातील मोम्बासा शहरात राहत असून योगिनीचं आयुष्य व्यतित करत आहे.
शुक्रवारी ममता कुलकर्णीच्या वकिलांची टीम मुंबईमध्ये आली होती. त्यावेळेस त्यांनी ममता कुलकर्णीवरील सर्वच आरोपांचे खंडन केले. या टीम मध्ये एमझेडएम लीगलचे वरिष्ठ भागीदार ऍड.परवेझ मेमन, न्यूयॉर्क मधील ममता कुलकर्णीचे वकील ऍड. डॅनियल अरशक, केनिया मधील ममता कुलकर्णीचे वकील ऍड.क्लिफ ओंबेटा, या प्रकरणातील अजून एक आरोपी जय मुखीचे वकील सुदीप पासबोला, प्रसिद्ध वकील, मानवाधिकारतज्ज्ञ आणि खासदार ऍड. माजिद मेमन हे देखील यावेळी उपस्थित होते.
निव्वळ ‘ड्रग एन्फोर्समेन्ट ऍडमिनिस्ट्रेशन’ या अमेरिकन संस्थेच्या थेट हस्तक्षेप, मार्गदर्शन आणि निर्देशावरुन ठाणे पोलिसांनी सिनेअभिनेत्री ममता कुलकर्णीचं या अंमली पदार्थ प्रकरणात नाव गोवलं आहे. तिचा काडीमात्र देखील या प्रकरणाशी संबंध नाही. कोणताही ठोस पुरावा सादर न करता ठाणे पोलिसांनी २ हजार कोटी रुपयांच्या या सिनेअभिनेत्रीचे अंमली पदार्थात नाव गोवले आहे. असे यावेळी या सर्व वकिलांनी ममता कुलकर्णीची बाजू मांडताना सांगितले.