मुंबई - जम्मू काश्मीरमधील उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील जवानांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. ही मदत वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केली.
महाराष्ट्रातील शहीद जवानांमध्ये नाशिक जिल्ह्यातील खडांगळीतील संदीप सोमनाथ ठोक, सातारा जिल्ह्यातील जाशी येथील लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे, अमरावती जिल्ह्यातील नांदगाव येथील शिपाई विकास उर्फ पंजाब जानराव उईके व यवतमाळ जिल्ह्यातील पुरड येथील शिपाई विकास जनार्दन कुळमेथे यांचा समावेश आहे. या शहीदांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून १५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. उरी येथील लष्करी तळाला रविवारी दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. हल्ल्यातील जखमी जवानांवर अजूनही लष्करी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.