यापुढे पालिकेच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी डी.पी. ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 September 2016

यापुढे पालिकेच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी डी.पी. !

मुंबई - पालिकेच्या प्रस्तावित विकास आराखड्याची सुनियोजित पद्धतीने अंमलबजावणी करता यावी यासाठी आर्थिक वर्ष २०१७ – १८ पासून महापालिकेच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाच्या केंद्रस्थानी विकास नियोजन आराखडा असणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिली आहे

पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालिका अधिका-यांची मासिक आढावा बैठक आज सकाळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे)आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांच्यासह पालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. या संपन्न झालेल्या बैठकी दरम्यान


विशेष कार्य अधिकारी (विकास आराखडा पुनर्रचना) रमानाथ झा यांनी आजच्या बैठकीच्या सुरुवातीला प्रस्तावित विकास आराखड्याच्या अंमलबजावणीमध्ये पालिकेच्या प्रशासकीय विभागांची व सहाय्यक आयुक्तांची भूमिका काय असेल? याबाबत सविस्तर सादरीकरण व मार्गदर्शन केले.पालिकेच्या प्रस्तावित विकास आराखड्याची सुनियोजित पद्धतीने अंमलबजावणी करता यावी यासाठी आर्थिक वर्ष २०१७ – १८ पासून पालिकेच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाच्या केंद्रस्थानी विकास नियोजन आराखडा असणार असल्याचा निर्णय घेण्यात आला या प्रस्तावित विकास आराखड्यात नमूद करण्यात आलेल्या विविध नागरी सेवा-सुविधा व प्रकल्पांशी निगडीत बाबींच्या अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कोणती तरतूद कशा प्रकारे करता येऊ शकते, याचीही सविस्तर माहिती झा यांनी आजच्या बैठकी दरम्यान दिली. तसेच या अनुषंगाने उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व वरिष्ठ अधिकारी यांनी मांडलेल्या विविध शंकांचेही झा यांनी समाधान केले. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी प्रस्तावित विकास नियोजन आराखड्याच्या अंमलबजावणी बाबत सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांनी आपल्या कार्यक्षेत्राशी संबंधित नियोजनात्मक कार्यवाही करण्यास सुरुवात करावी, असे आदेश दिले. विकास आराखड्यात आपल्या विभागाशी संबंधित असणा-या सर्व बाबींचे सविस्तर वाचन व अभ्यास करुन या नियोजनात्मक कार्यवाहीची सुरुवात करावी, असेही पालिका आयुक्त मेहता यांनी आजच्या बैठकी दरम्यान संबंधित अधिका-यांना सांगितले

आगामी निवडणुकींबाबत जनजागृती करण्याचे आदेशपुढील वर्षी होणा-या पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने व निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार पालिकेद्वारे करण्यात येणा-या कार्यवाहींबाबत उपायुक्त (करनिर्धारण व संकलन) डॉ. बापू पवार यांनी संगणकीय सादरीकरण केले.पालिका निवडणुकींच्या अनुषंगाने अधिक प्रभावी व सर्वस्तरीय जनजागृती करावी. यामध्ये विशेष करुन विद्यापीठ व महाविद्यालयांच्या स्तरावर विशेष प्रयत्न करावेत. तसेच १ जानेवारी २०१७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणा-या युवक-युवतींनी मतदार यादीत नाव नोंदवावे, यासाठी विशेष जनजागृती मोहिम राबवावी, असेही आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संबंधितांना दिले.

सणांच्या काळात साफसफाई बाबत काळजी घ्या !पालिकेद्वारे पालिका क्षेत्रातील साफसफाई व स्वच्छतेबाबत नियमित स्वरुपात दैनंदिन पद्धतीने कार्यवाही केली जात असते. मात्र आता गणेशोत्सव, बकरी ईद, नवरात्री, दसरा यासारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर अधिक सजग राहून साफसफाई करण् गरजेचे आहे. यादृष्टीने अधिक नियोजन पद्धतीने व सुव्यवस्थित पद्धतीने महापालिका क्षेत्रातील साफसफाई व स्वच्छतेबाबत कार्यवाही करावी असेही आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आजच्या बैठकी दरम्यान पालिकेच्या सर्व ७ परिमंडळीय उपायुक्तांनी त्यांच्या कार्यक्षेत्रांमधील कार्यवाहींबाबत सविस्तर सादरीकरण देखील केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad