सामाजिक समता सलोखा राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करूया - रामदास आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सामाजिक समता सलोखा राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करूया - रामदास आठवले

Share This
सांगली - "जरी झाला असला कितीही वेळ तरी मला घालायचाय मराठा आणि दलितांमध्ये एकजुटीचा मेळ" अशी काव्यत्मक घोषणा करून राज्यात दलित मराठा यांच्या एकजुटीची ताकद उभी करण्याचा आणि सामाजिक समता सलोखा राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करूया. दलित आणि सवर्णांमध्ये सौख्य राहावे त्यामुळेच आट्रॉसिटी कायदा संसदेने सर्वसम्मतीने केला असून त्यात बदल होणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय सामाजीक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी सांगली येथे केले

आरक्षणावरुन होणारे वाद कायमचे मिटविण्यासाठी आरक्षणाची मर्यादा 52 टक्क्यांहून 75 टक्क्यांपर्यंत वाढविणारा संसदेत कायदा केला पाहिजे मराठा राजपूत जाट लिंगायत ब्राह्मण आदी जातींना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आपण सर्वप्रथम केली होती असे आठवले म्हणाले. भारत देशात सांगली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल नवनिर्वाचित केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा ( 3 सप्टेंबर) समस्त सांगलीकरांच्या वतीने भव्य नागरी सत्कार विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सांगलीकरांनी तुफान गर्दी केली होती.

यावेळी दिवंगत आर आर पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार अनिल बाबर वैभव नायकवडी तसेच सीमाताई आठवले आणि शिलाताई अनिल गांगुर्डे स्वागताध्यक्ष विठ्ठल पाटील रिपाइं चे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे माजी महापौर विवेक कांबळे रासप नेते भीमराव जामुने,  युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे रिपाइं चे अंकुश कांबळे विनोद निकाळजे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान वाळवा येथील हुतात्मा उद्योग आणि शिक्षण समूहाला आठवलेंनी भेट दिली तेथील क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडिंच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून आठवलेंनी आदरांजली वाहिली तसेच हुतात्मा किसन अहिर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला हुतात्मा शाळेत या समूहातर्फे नामदार रामदास आठवलेंचा ह्रिदय सत्कार करण्यात आला

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages