मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या मध्य वैतरणा जलाशयाचे ‘हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ असे नामकरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा स्थानिक आमदार विष्णू सवरा, पर्यावरण मंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे या विशेष अतिथींच्या उपस्थितीत गुरुवार, दिनांक ०१ सप्टेंबर, २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता मध्य वैतरण धरण, मु.पो. कोचाळे, ता. मोखाडा, जि. पालघर – ४०१ ६०४ येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
या समारंभास स्थानिक खासदार ऍड. चिंतामण वनगा, मुंबईच्या उप महापौर अलका केरकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या समारंभास सन्माननीय अतिथी म्हणून सभागृह नेता तृष्णा विश्वासराव, विरोधी पक्ष नेते प्रविण छेडा, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, महापालिकेतील विविध पदाधिकारी, गटनेते, वैधानिक समिती व विशेष समित्यांचे अध्यक्ष, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) रमेश बांबळे, स्थानिक लोकप्रतिनिधी, सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनाही सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.

‘मध्य वैतरणा प्रकल्पाची ठळक वैशिष्टये’ याविषयी - मुंबईला प्रतिदिन ४५५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा या तलावातून होतो. मुंबईपासून १४५ किलोमीटर उत्तर पूर्व दिशेला कोचाळे, ता. मोखाडा, जि.पालघर येथे उर्ध्व वैतरणा व मोडकसागर प्रकल्प यांच्या मधोमध हा प्रकल्प आहे. या तलावाचे एकूण १२३.४ चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र आहे. या तलाव क्षेत्रात सरासरी वार्षिक पर्जन्यमान २८७५ मिमी होते. धरणाचे बुडीत क्षेत्र एकूण ६४४ हेक्टर आहे. तलावाची पाण्याचा एकूण संचय क्षमता ही २०२.१० दशलक्ष घनमीटर असून यापैकी १९३.५३ दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा तर ८.५७ दशलक्ष घनमीटर मृतजल साठा आहे. काँक्रिट गुरुत्वीय प्रकारातील या धरणाचे बांधकाम रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रिट (आर.सी.सी.) तंत्राने करण्यात आले आहे. या धरणाची एकूण लांबी ही ५६५ मीटर असून एकूण उंची १०२.४० मीटर (नदीच्या तळ पातळीपासून) आहे तर एकूण आकारमान १.५ दशलक्ष घनमीटर आहे.
या धरणाला वक्राकार असे १५मीटर x १२ मीटर आकाराचे पाच दरवाजे असून या धरणासाठी २ लाख ३२० मेट्रीक टन सिमेंट आणि १ लाख ७१ हजार ३०३ मेट्रीक टन प्लॉय ऍश उपयोगात आली आहे. मोठया प्रमाणात प्लाय ऍशचा वापर केल्याने प्रकल्प खर्चात लक्षणीय बचत झाली आहे. या प्रकल्पाचे काम दिनांक २८ मार्च, २०१४ रोजी पूर्ण करण्यात आले आहे. या धरणाच्या मुख्य भिंतीचे काम विक्रमी वेळेत म्हणजेच १५.५ महिन्यांत पूर्ण करण्यात आल्यामुळे हे धरण जगातील ५५० धरणांपैकी जलद गतीने बांधलेल्या धरणांमध्ये ९ व्या क्रमांकावर समाविष्ट झाले आहे. देशातील राष्ट्रीय महत्वाच्या सहा धरणांमध्ये या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र व राज्य शासनाकडून जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानअंतर्गत अनुदान प्राप्त झाले आहे.

No comments:
Post a Comment