मुंबई, दि. 31 : मागासवर्गाच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांना सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2016 आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत शाहू,फुले, आंबेडकर पारितोषिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार आदी पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. या पुरस्कारासाठी मागासवर्गीय, वंचित, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, व्यसनमुक्ती अंधश्रद्धा आदी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तिंकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पुरस्कारासाठी अटी व शर्ती याबाबतच्या माहितीसाठी इच्छुक व्यक्ती व संस्था यांनी संबंधित जिल्ह्यांचे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण आयुक्तांनी केले आहे.

No comments:
Post a Comment