पाच आयएएस, आयपीएस अधिकार्‍यांच्या घरात डंग्यूच्या अळ्या - मात्र कारवाई नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 September 2016

पाच आयएएस, आयपीएस अधिकार्‍यांच्या घरात डंग्यूच्या अळ्या - मात्र कारवाई नाही

मुंबई / प्रतिनिधी - मुंबई शहरात झोपडपट्टीपेक्षा चार पटीने इमारतीमध्ये डेंग्यूच्या आळयांची उत्पत्ती स्थाने आहेत या पालिकेच्या वक्तव्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. राज्याचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालया शेजारील आयएएस, आयपीएस अधिकारी राहत असलेल्या इमारतीमध्येही डेंग्यूच्या आळ्या सापडल्या आहेत. अश्या परिस्थितीत सामान्य नागरिकांवर नोटीस बजावून दंड वसूल केला जातो, कारवाईही होते. परंतू आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.



मंत्रालयाशेजारी असलेल्या ‘यशोधन’ या  आयएएस अधिकारी राहत असलेल्या इमारतीत आज (२० सप्टेंबर) मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने पाहणी केली. या पाहणीत आशिष सिंह (माजी पालिका अतिरिक्त आयुक्त) (रूम नं. २९), कुंड्यांच्या खाली असलेल्या डिशमध्ये, जे.एन. सहारिया (राज्य निवडणूक आयुक्त) रूम नं. ११, धातूच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यात, अजित कुमार जैन (रूम नं. २२) चिनी मातीच्या भांड्यात, नवीन खोना (रूम नं. ६) कुंड्यांच्या खाली असलेल्या डिशमध्ये, शामलाल गोयल (रूम. नं. २५) प्लास्टिक पेपरमध्ये पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास आढळून आली. या अधिकार्‍यांच्या नावांबाबत पालिका प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळली आहे.

डेंग्यूच्या अळ्या घरात सापडल्यावर सामान्य नागरिक आणि सेलिब्रिटी यांना पालिका लगेच नोटीस देते. कायदेशीर कारवाई करून कोर्टातही खेचते. मात्र यशोधनमध्ये सापडलेल्या अळ्या नष्ट करण्यापलीकडे कोणतीही कारवाई प्रशासनाने केली नाही. प्रशासनाने याप्रकरणी कमालीची गुप्तता पाळल्यामुळे पालिका प्रशासन आयएएस, आयपीएस अधिकार्‍यांसाठी वेगळा नियम लावून वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS