शरद राव यांच्यावर अंत्यसंस्कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शरद राव यांच्यावर अंत्यसंस्कार

Share This
मुंबई - कामगार नेते शरद राव यांच्यावर शनिवारी दुपारी हजारो नागरिकांच्या उपस्थित ओशिवरा स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांचे पुत्र व कामगार नेते शशांक राव यांनी चितेला अग्नी दिला. त्यानंतर झालेल्या शोकसभेत अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर व कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरुवारी दुपारी चार वाजता त्यांचे विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात निधन झाले होते. त्यांची कन्या शिल्पा कॅनडाहून परतल्यानंतर शनिवारी अंत्यसंस्कार करण्याचे ठरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी शुक्रवारी रात्री गोरेगांव बांगूर नगर येथील जलनिधी सोसायटीमधील त्यांच्या घरी जाऊन त्यांचे चिरंजीव व कामगार नेते शशांक राव आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. शनिवारी सकाळी हजारो कामगारांच्या उपस्थितीत त्यांची अंत्ययात्रा निवासस्थानापासून निघाली. तत्पूर्वी आठ वाजता त्यांचा पार्थिव देह त्यांच्या जलनिधी सोसायटीच्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. आपल्या या लाडक्या कामगार नेत्याचे हजारो कामगारांनी अंत्यदर्शन घेतले.

शिक्षण मंत्रीविनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, खासदार गजानन कीर्तिकर, खासदार हुसेन दलवाई, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी कामगार राज्यमंत्री व कामगार नेते सचिन अहिर, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, कामगार नेते आमदार भाई जगताप, कामगार नेते भूषण सामंत, कोलकाताहून आलेले कामगार नेते नूर अहमद, नागपूरहून आलेले कामगार नेते शब्बीर अहमद विद्रोही, दिल्लीवरुन आलेले कामगार नेते हरभजनसिंग सिंधू आणि अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages