कर्करोगाच्या निर्मूलनासाठी जनजागृतीची आवश्यकता - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कर्करोगाच्या निर्मूलनासाठी जनजागृतीची आवश्यकता

Share This
मुंबई, दि. 27 : छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे ॲसेस लाईफच्या वतीने चाईल्ड कॅन्सर अवेरनेस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्‍यावेळी फडणवीस बोलत होत्या. चित्रपट अभिनेते वरुण धवन, ॲसेस लाईफचे संस्थापक व चेअरमन गिरीश नायर, अनिकेत दवे, मध्य रेल्वे उप कार्यकारी व्यवस्थापक साकेत मिश्रा आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाल्या की, जगात 10 करोड मुलांत कॅन्सरचे निदान झाले आहे. लहान मुलांमध्ये कॅन्सर बरा होण्याचे प्रमाण 90 टक्के आहे. त्यामुळे योग्य औषधोपचाराद्वारे त्यावर मात करणे शक्य आहे. त्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. शासनही यासाठी प्रयत्न करत आहे. कॅन्सर पिडीत मुलांबाबत सुरु असलेल्या ॲसेस लाईफच्या योगदानाचे कौतुक करुन कॅन्सरला हद्दपार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ॲसेस लाईफच्या वतीने कॅन्सर पिडीत मुलांसाठी राबविण्यात येत असलेल्या कार्याबाबतची चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. कॅन्सरचे योग्य उपचाराद्वारे निदान केलेल्यांचा फडणवीस तसेच वरुण धवन यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. वरुण धवन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages