भाजप आमदाराची पोलिसांशी हुज्जत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाजप आमदाराची पोलिसांशी हुज्जत

Share This
मुंबई : शहीद विलास शिंदे यांच्या मृत्यूनंतर पोलीस दलाचे सक्षमीकरण करून धैर्य वाढवण्याच्या घोषणा सरकारकडून केल्या जात असतानाच सरकार चालणाऱ्या भाजपाच्या मुंबईमधील राज पुरोहित या आमदारांनी गाडी पार्किंगवरून पोलिसांना शिवीगाळ करून हुज्जत घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, एल. टी. मार्ग पोलीस स्टेशन समोरील हनुमान मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाजप आमदार राज पुरोहित यांनी आपली गाडी पोलीस स्टेशनच्या गेटवरच लावल्याने वाहतूककोंडी झाली, त्या वेळी तेथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडताना आमदारांची गाडी दुसर्‍या ठिकाणी पार्क करण्याची विनंती ड्रायव्हरला केली, यामुळे गाडीतील आमदार राज पुरोहितचा संताप अनावर झाला व त्यांनी पोलिसांवर आपली दबंगगिरी सुरू केली. त्यांनी ड्युटीवर तैनात असलेल्या पोलीस कर्मचार्‍याला अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व स्वत:ची गाडी पोलीस स्टेशनच्या आत पार्क करण्याची धमकी दिली. येवढ्यावरच न थांबता पोलिसांच्या दिशेने धावत जाऊन मी इकडचा आमदार आहे, अशी आठवण करून दिली. इतकेच नव्हे तर भेंडीबाजारात जाऊन ड्युट्या करा असे पुरोहित यांनी पोलिसांना म्हटले आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना पोलीस स्टेशनसमोरील सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेली असून, घटने वेळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या अनेक नागरिकांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages