मुंबई : "मंत्रालयावर चिल्लर फेको" आंदोलनानंतर रहेजा कला महाविद्यालयावर प्रशासकीय अधिकारी नेमण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले, परंतु काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. महाविद्यालयाने फाउंडेशन कोर्स सुरू केला नाही आणि सरकारने महाविद्यालयावर प्रशासकीय अधिकारी नेमला नाही, तर "शिक्षणमंत्र्यांची झोपमोड आंदोलन" छेडण्यात येईल, असा इशारा "विद्यार्थी भारती" संघटनेने शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
गेल्या दोन महिन्यांपासून रहेजा कला महाविद्यालयातील फाउंडेशन अभ्यासक्रम सुरू करण्यासह विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेल्या जादा फीविरोधात विद्यार्थी भारती संघटना आक्रमक झाली आहे. या प्रश्नावर शिक्षणमंत्री विनोद तावडे केवळ तोंडी आश्वासन देत आहेत, असा आरोप संघटनेने केला आहे. रहेजा स्कूलमध्ये फाउंडेशन अभ्यासक्रम सुरू झाला पाहिजे. डिमांड ड्राफ्ट स्वरूपात घेतलेली जादा फी परत करण्यात यावी. कला शाखेचे स्वतंत्र विद्यापीठ असावे. अनुदानित अभ्यासक्रम कोणत्याही कारणास्तव बंद करण्यात येऊ नये. जी.डी. आर्टच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करावी. शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी शासकीय स्कॉलरशिप सुरू करावी या मागण्यांबरोबरच शिक्षण मंत्र्यानी आपल्या आश्वासनानुसार कार्यवाही करण्याची मागणी केली.

No comments:
Post a Comment