मुंबई : ऑल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्पलॉइस असोसिएशन, पश्चिम रेल्वे मुंबई डिव्हिजनच्या वतीने ४ सप्टेंबर रोजी एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन केले आहे. मुंबई सेंट्रल येथील रेल्वे निकुंज सभागृह येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान परिसंवाद भरेल.
पदोन्नतीमधील आरक्षण या विषयावर सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील अँड़ मनोज गोरकेला विस्तृत मार्गदर्शन करणार आहेत. देशामध्ये विविध सरकारी, निमसरकारी विभागांमध्ये मागासवर्गीय समाजातील आरक्षण आणि पदोन्नतीमधील आरक्षण हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मागासवर्गीय केंद्रीय कर्मचार्यांच्या पदोन्नती आदेशावर कॅटच्या माध्यमातून स्थगिती आदेश घेण्यात मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याने कर्मचार्यांमध्ये या विषयासंदर्भात संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी भरणारे परिसंवाद मोफत असून, सरकारी खात्यातील किंवा निमसरकारी कर्मचार्यांनी मोठय़ा संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन डिव्हिजन सेक्रेटरी जितेंद्र गजभिये यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment