अहमदाबाद दि 31 Aug 2016 - देशात भटक्या विमुक्तांच्या एकूण 190 जाती विखुरलेल्या आहेत त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती दलितांहुन हालाकीची आहे. नोकरी, शिक्षण आणि राजकीय आरक्षण स्वतंत्र प्रवर्ग करून मिळावे हि भटक्या विमुक्तांची मागणी योग्य असून त्याचा सामाजिक न्याय मंत्रालयाकडून निश्चित विचार होईल प्रधानमंत्र्यांशी याबाबत बोलून भटक्या विमुक्तांना स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण देण्याचा विचार करणार असल्याचे आश्वासन केंद्रिय समाजीक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिले.
देशभरातील भटक्या विमुक्तांच्या 190 जातींचा रेणके आणि आता विधाते आयोगाने अभ्यास केला आहे. त्यातील अनेक जाती एसटी, ओबीसी, एन टी आणि काही जाती ओपन मध्ये नोंदल्या गेल्या असल्याने या सर्व 190 जातींना एकत्र स्वतंत्र काटेगरी करून आरक्षण दिले पाहिजे, त्यानुसार त्यांनी केलेल्या शिफारशी आणि मागण्यांचा तसेच स्वतंत्र प्रवर्ग करून भटक्या विमुक्तांना एकत्रित स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीचा सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे विचार करण्यात येईल असे आश्वासन आठवले यांनी यावेळी दिले.
अहमदाबाद मधील पालडी येथील रविंद्रनाथ टागोर हॉल येथे भटक्या विमुक्तांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी 31 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा होतो 31 ऑगस्ट 1952 रोजी ब्रिटिशांनी तुरुंगात डांबलेल्या भटक्या विमुक्तांना स्वतंत्र करण्यात आले. तेंव्हापासून भटकेविमुक्त दरवर्षी 31 ऑगस्ट हा त्यांचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतात त्यानिमित्त झालेल्या भटक्या विमुक्तांच्या मेळाव्यास 9 राज्यांतील मदारी पारधी आदि जातींचे हजारो भटके विमुक्त उपस्थित होते. त्यात नवनिर्वाचित केंद्रिय राज्यमंत्री नामदार रामदास आठवलें यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नामदार आठवलेंचा भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी विचारमंचावर रिपाइंचे गुजरात प्रदेशाध्यक्ष अशोक भट्टी तसेच उदयन थिएटर या संस्थेचे पदाधिकारी सचिन बजरंगी आनंदराव साळवे लिलाबेन वाघेला आदी मान्यवर उपस्थित होते.
देशभरातील भटक्या विमुक्तांच्या 190 जातींचा रेणके आणि आता विधाते आयोगाने अभ्यास केला आहे. त्यातील अनेक जाती एसटी, ओबीसी, एन टी आणि काही जाती ओपन मध्ये नोंदल्या गेल्या असल्याने या सर्व 190 जातींना एकत्र स्वतंत्र काटेगरी करून आरक्षण दिले पाहिजे, त्यानुसार त्यांनी केलेल्या शिफारशी आणि मागण्यांचा तसेच स्वतंत्र प्रवर्ग करून भटक्या विमुक्तांना एकत्रित स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीचा सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे विचार करण्यात येईल असे आश्वासन आठवले यांनी यावेळी दिले.

No comments:
Post a Comment