नवी मुंबई- वाशी नवी मुंबई येथील शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या कार्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडने स्वीकारली आहे. ‘सामना’च्या ठाण्यातील कार्यालयावरही शाईफेक करण्यात आली आहे. नवी मुंबईत तीन तरुणांनी दोन दुचाकींवरून येऊन दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे.
वाशीमध्ये सामनाची प्रेस आहे. या प्रेसवरच तरुणांनी हल्लाबोल केला. ठाण्यातील नितीन कंपनी परिसरातील सामनाच्या कार्यालयावर शाई फेकण्यात आली आहे. मराठा मोर्चावरुन ‘सामना’मध्ये रविवारी वादग्रस्त कार्टून छापलं होते. त्याच रागातून ही दगडफेक झाल्याचं सांगितले जात आहे. वादग्रस्त कार्टूनमुळे ठिकठिकाणी 'सामना' जाळून निषेध नोंदवला जात आहे. या हल्ल्या प्रकरणी सानपाडा पोलिसांनी संभाजी ब्रिगेडचे पुरुषोत्तम खेडेकर, अमोल जाधवराव, अण्णासाहेब सावंत, मनोज आखरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.