मुंबई - मध्य व पश्चिम रेल्वेवर रविवारी (ता.4) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. मुलुंडपासून माटुंग्यापर्यंतच्या धीम्या मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 3.20 पर्यंत दुरुस्तीचे काम करण्यात येईल. या वेळेत या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात येईल.
नाहुर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकात लोकल थांबणार नाहीत. ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल सकाळी 10.08 ते दुपारी 2.42 या वेळेत आणि सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल सकाळी 11.22 ते दुपारी 3.28 या वेळेत 15 मिनिटे उशिरा धावतील. ब्लॉकदरम्यान सीएसटीहून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व धीम्या मार्गावरील लोकल सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत 10 मिनिटे उशिरा धावतील. चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान सकाळी 10.35 पासून दुपारी 3.35 पर्यंत दोन्ही धीम्या मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येतील. दोन्ही मार्गांवरील लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येतील.

No comments:
Post a Comment