बलात्काऱ्यांना जात नसते, बलात्कारी हा बलात्कारीच असतो - नागराज मंजुळे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बलात्काऱ्यांना जात नसते, बलात्कारी हा बलात्कारीच असतो - नागराज मंजुळे

Share This
नाशिक- बलात्काऱ्यांना कोणतीच जात नसते. बलात्कारी हा बलात्कारीच असतो त्याच्याविषयी कोणताच युक्तिवाद होऊ शकत नाही असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी कोपर्डी घटनेच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले. भारतीय राज्यघटनेच्या प्रास्तविकाचे वाचन करुन रावसाहेब थोरात सभागृहात नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत दुसऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संमेलनाचे उद्घाटन झाले या प्रसंगी ते बोलत होते.

दलितावर अन्याय झाला की दलित लोक आणि मराठ्यावर अन्याय झाला की मराठा एकत्र येतात आणि मोर्चा काडतात. हे खूप घातक असून सर्वांनी एकत्र येऊन या प्रश्नावर चर्चा करणे गरजेचे आहे, असे मत सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे राष्ट्रपुरुषांचे पुतळे त्यांचे कर्तृत्व सांगत नसून पुस्तके आणि साहित्य त्यांचे विचार सांगतात. आंबेडकर जयंतीच्या मिरवणूक काढणे बंद केले पाहिजे व डीजे वरही बंदी आणली पाहिजे, असेही नागराज मंजुळे यांनी व्यासपीठावरुन बोलताना सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, की कोपरडीच्या घटनेनंतर बलात्कार करणाऱ्याची जात पहिली जात असून बलात्कार करणे हा गुन्हाच आहे. हल्ली एकत्र येऊन खून,बलात्कार, दंगली अशा घटना घडतात. मात्र एकत्र येऊन संमेलन व्हायला पाहीजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत असून त्यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी डॉ. बाबासाहेब विचार संमेलन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी अशा प्रकारे विचार संमेलनांचे आयोजन करण्यात येत असून नागपूर येथे पहिले विचार संमेलन यशस्वी झाल्यानंतर कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, प्रगतीशील लेखक संघ, आशीर्वाद फाउंडेशन व केटीएटएम महाविद्यालय यांनी संयुक्तरीत्या येथील रावसाहेब थोरात सभागृहात या विचार संमेलनाचे आयोजन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages