मुस्लीम समाजातील लोकांनांच मतदान करा - ओवैसी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुस्लीम समाजातील लोकांनांच मतदान करा - ओवैसी

Share This
मुरादाबाद - मुस्लीमांनी केवळ आपल्याच समाजातील लोकांना मतदान केले पाहिजे, असे आवाहन ‘ऑल इंडिया मज्लिस ए इतेहदुल मुसलिमीन’ (एआयएमआयएम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. युपीच्या आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ओवैसी यांनी असे वक्तव्य केले आहे.
समाजवादी पक्षावर जोरदार हल्ला करताना ओवैसी म्हणाले, मुस्लीमांनी कोणत्याही पक्षासोबत जाण्याची गरज नाही. तुम्ही आपल्याच समाजातील लोकांना मतदान करा. किमान 10 ते 12 आमदारांना निवडून आणा, मग 70 वर्षां पुर्वीचे बदला घेऊ, असा इशारा ओवैसी यांनी दिला आहे.

समाजवादी पक्षाने मुस्लीम समाजासाठी आतापर्यंत काहीही केले नाही. मुजफ्फरनगर येथील दंगलीमध्ये मरण पावलेल्या कुटुंबियांना आजतागायत न्याय मिळाले नाही. दंगलीनंतर समाजवादी पक्षाने केवळ मुस्लीम मुलांना तुरूंगात टाकले आहे. तसेच गुजरात येथील दंगलीला आम्ही विसरलो नाही. यासर्व घटनांचा आपल्याला बदला घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्याच लोकांना मतदान करा, असे आवाहन ओवैसी यांनी मुस्लीम समुदायातील लोकांना केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages