मुंबई, दि. 14 : मुंबई शहर जिल्ह्यातील छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम मुंबई शहर जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी जाहीर केला. भारत निवडणूक आयोगाने दि. 01/01/2017 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील एकूण मतदार 23 लाख 95 हजार 695 इतके आहेत. पुरुष मतदार संख्या 13 लाख 18 हजार 216 व स्त्री मतदार संख्या 10 लाख 77 हजार 396 इतके आहे. पुरवणी यादीसह दि.16/09/2016 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येत असून ती सर्व नागरिकांना पाहण्यासाठी विधानसभा मतदारसंघाची मध्यवर्ती कार्यालये तसेच पदनिर्देशित ठिकाणी आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे संकेतस्थळ ceo.maharashtra.gov.in वर दि. 16/09/2016 ते 14/10/2016 या कालावधीत उपलब्ध राहणार आहे. सदर कालावधीत मतदारांना नवीन नाव नोंदणी करणे, वगळणे, नाव, वय, लिंग व पत्ता यामध्ये दुरुस्ती करणे यासाठी नमुना फॉर्म्स भरुन ते विधानसभा मतदारसंघाचे मध्यवर्ती कार्यालयात तसेच पदनिर्देशित ठिकाणी सादर करता येणार आहे.
मतदारांच्या सोयीसाठी दि. 18/09/2016 व 09/10/2016 या दोन सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विशेष मोहिमेचे आयोजन केलेले आहे. तसेच ज्या राजकीय पक्षांनी अद्यापही बीएलएच्या नेमणूका केल्या नाहीत. त्या करण्याबद्दल राजकीय पक्षांना जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.
मतदार यादी प्रसिध्दीचा कार्यक्रम सुरु झाल्यानंतर दर दिवशी प्राप्त होणाऱ्या नमुना 6,7 व 8अ च्या अर्जांची यादी विहित प्रपत्रात भरुन ती ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच सदर यादीची प्रत राजकीय पक्षांनाही आठवड्यातून एकदा मतदार नोंदणी अधिकारी यांचे मार्फत पुरविण्यात येणार आहे. सदर यादीवर काही आक्षेप/हरकती असल्यास त्या मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे विहित मुदतीत नोंदविणेबद्दल राजकीय पक्षांना आवाहन करण्यात आले आहे.
दि. 16/09/2016 रोजी प्रसिध्द होणारी मतदार यादी विधानसभा मतदार संघाचे मध्यवर्ती कार्यालयातही प्रसिध्द करण्यात येणार असून त्याच ठिकाणी मतदार मदत केंद्र (Voter help Centre) सुरु ठेवण्यात येणार आहे. नागरिकांना माहितीसाठी 1950 या कॉल सेंटरवर दूरध्वनी करुन मतदार यादी संदर्भातील माहिती मिळणार आहे. सदर कॉल सेंटर सकाळी 10.00 ते सायं. 06.00 या वेळेत सुरु राहील.
पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे व कालावधीप्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी दि. 16 सप्टेंबर 2016

दावे व हरकती स्वीकारण्याचा दिनांक दि. 16 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर, 2016
मतदार यादीमधील संबंधित भागाचे/सेक्शनचे ग्रामसभा/स्थानिक संस्था येथे वाचन व आरडब्ल्यूए सोबत बैठक इत्यादी आणि नावांची खातरजमा करणे
दि. 16 सप्टेंबर 2016 व दि. 30 सप्टेंबर 2016
विशेष मोहिमेचे दिनांक
दि. 18 सप्टेंबर 2016 व दि. 9 ऑक्टोबर 2016
दावे व हरकती निकालात काढणे
दि. 16 नोव्हेंबर 2016 पर्यंत
डाटाबेसचे अद्ययवतीकरण इत्यादी
दि. 15 डिसेंबर 2016 पर्यंत
अंतिम मतदार यादी प्रसिध्दी
दि. 5 जानेवारी 2017 पर्यंत