पालिका शिक्षणाचे भगवेकरण - सपा रस्त्यावरील आंदोलना बरोबर न्यायालयात आव्हान देणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका शिक्षणाचे भगवेकरण - सपा रस्त्यावरील आंदोलना बरोबर न्यायालयात आव्हान देणार

Share This
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या शाळांध्ये सूर्यनमस्कार आणि योगासने बंधनकारक करण्याचा प्रस्ताव भाजपा व शिवसेनेने मंजूर केला आहे. यामुळे पालिकेतील सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्याना सूर्यनमस्कार आणि योगासने करणे बंधनकारक होणार आहे. हा प्रकार म्हणजे शिक्षणाचा भगवेकरण करण्याचा असल्याने समाजवादी पक्ष सर्व सम विचारी संघटना व पक्षांना सोबत घेवुन गणेशोत्सव व ईदनंतर आपले आंदोलन तीव्र करणार आहे, अशी माहिती सपाचे पालिका गटनेते रईस शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पालिकेच्या सभागृहात योगा आणि सूर्यनमस्कार सक्तीचे करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या माध्यमातून भाजपा आपला भगवेकरनाचा अजेंडा इतर धर्मियांवर लादत आहे. यामुले समाजवादी पक्ष व इतर राजकीय पक्षांनी पालिका आयुक्तांना पत्र देवून योगा आणि सूर्यनमस्काराची सक्ती करू नए अशी मागणी पत्राद्वारे केली होती. सभागृहात प्रस्ताव मंजूर होण्याआधीच शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी असे परिपत्रक काढून शाळाना योगा आणि सूर्यनमस्कार सक्तीचे केले आहे. त्यासाठी इशा फ़ौंडेशन या एनजीओला पालिका शाळांमधे आणले जाणार आहे. हा प्रकार म्हणजे शुद्ध भगवेकरणाचा असल्याने आयुक्तांना पत्र दिले होते. परंतू आयुक्त हे भाजपाच्या इशाऱ्यावर चालत असल्याने शिक्षण अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे शेख यांनी सांगितले.

पालिका आयुक्तांना अनेक पक्षांनी निवेदने देवून योगा आणि सूर्यनमस्कार सक्तीचे करू नये अशी मागणी केली आहे. सभागृहात प्रस्ताव मंजूर झाला असला तरी शेवटी निर्णय आयुक्तांना घ्यायचा आहे. आयुक्त हे शिक्षण अधिकाऱ्याला पाठीशी घालत असल्याने आयुक्तही भाजपाच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा आरोप शेख यांनी केला. पालिकेने योगा आणि सूर्यनमस्कार ऐच्छिक न केल्यास याबाबत गणेशोत्सव व इद सणाच्या नंतर राज्यभर आंदोलन करण्यात येइल तसेच या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याचे शेख यांनी सांगितले. यावेळी शेख यांच्यासह समाजवादी पक्षाचे कादिर चौधरी, रमाशंकर तिवारी, चंद्रप्रकाश मिश्रा उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages