14 व 15 ऑक्टोबरला मुंबईतील कापड बाजार बंद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

14 व 15 ऑक्टोबरला मुंबईतील कापड बाजार बंद

Share This
मुंबई / प्रतिनिधी - मुंबईमधील होलसेल कापड बाजारात काम करणारे कर्मचारी आपल्या विविध मागण्याकड़े दुर्लक्ष केले जात असल्याने 14 व 15 ऑक्टोबरला दोन दिवस बंद पाळणार असल्याची माहिती मुंबई गुमास्ता युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कापड बाजारात काम करणाऱ्या कामगारांसाठी 1996 साली गवांदे अवार्ड घोषित करण्यात आला. ग्राच्युएटी कायदा लागू करण्यात आला परंतू त्याची अमलबजावणी करण्यात आलेली नाही. मागील वर्षी बंद दरम्यान मालक असोसिएशन बरोबर चर्चा केल्यावर थकबाकी ऐवजी एकरकमी पैसे देण्याचे मान्य करण्यात आले. त्याचीही अमलबजावणी करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे असे राव यांनी सांगितले. कामगारांना 7 रुपये दराने डीए द्यावा, बेसिक कमीतकमी 2500 मिळावा, कामगार व त्यावर अवलंबून असणाऱ्याना 4 लाखापर्यंत मेडिक्लेम सुविधा मिळावी, कामगारांना कमीतकमी 20 हजार पगार मिळावा इत्यादी मागण्यासाठी बंद पाळला जाणार आहे. दोन दिवसाच्या बंद दरम्यान योग्य निर्णय न झाल्यास सोमवारपासून बेमुदत बंद केला जाईल असा इशारा राव यांनी दिला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages