माफियांच्या विरोधातील लढाई यापुढे अधिक तीव्र करणार - आशिष शेलार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 October 2016

माफियांच्या विरोधातील लढाई यापुढे अधिक तीव्र करणार - आशिष शेलार

मुंबई दि.१२  - मुलुंड येथे खासदार किरीट सोमिया यांच्या कार्यालयात जाऊन मुंबई भाजप अध्यक्ष आ. अॅड आशिष शेलार यांनी आज सकाळी त्यांची भेट घेतली. भ्रष्ट्राचार,माफिया यांच्याविरोधातील लढाईत पक्ष आपल्या सोबत आहे. असा विश्वास त्यांनी दिला. 

त्यानंतर मुलुंड येथे कालच्या घटनेत जखमी झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांचीही मुंबई भाजप अध्यक्ष आ. अॅड आशिष शेलार यांनी भेट घेतली. रुग्ण्यालयात जाऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलतांना मुंबई भाजप अध्यक्ष आ. अॅड आशिष शेलार म्हणाले की, माफिया राजचा रावण दहन हा भाजपाचा अधीकृत कार्यक्रम होता, ही लढाई सुरूचं राहील. ती यापुढे अधिक तीव्र केली जाईल. सुरुवात त्यांनी केलीय, अंत आम्ही करू. जशास तसं उत्तर दिले जाईल.भ्रष्टाचाऱ्यांच्या लढाईत आम्ही मागे हटणार नाही. भ्रष्टयाचाराच्या विरोधात भाजप आवाज उठवतच राहणार. माफियांच्या विरोधात आम्ही रावण दहन केले त्याची टोपी त्यांनाच कशी फिट बसली?

सर्जिकल स्ट्राईकवरून राजकीय प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर आमदार आशिष शेलार म्हणाले की, सर्जिकल स्ट्राईकच्या बाता यांनी मारू नये. हे काम करायला 56 इंचाची छाती लागते, यांनी सर्जिकल स्ट्राईकचा पोरखेळ करू नये. 56 इंचाची छाती असणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक केला. हे यांना जमणार नाही.

Post Bottom Ad

JPN NEWS