पालिका कर्मचाऱ्यांना 14 तर बेस्ट कर्मचाऱ्यांना 5500 रूपये बोनस - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका कर्मचाऱ्यांना 14 तर बेस्ट कर्मचाऱ्यांना 5500 रूपये बोनस

Share This


मुंबई / प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 14 हजार रुपये तर बेस्ट कर्मचाऱ्यांना 5500 रूपये बोनस देण्याचे महापौर स्नेहल आंबेकर यांनी जाहिर केले आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी 13 हजार 500 रूपये बोनस देण्यात आला होता. गेल्यावर्षी पालिकेवर बोनससाठी 149. 18 करोड़चा बोजा पडला होता. या वर्षी 20 हजार रुपये बोनस द्यावा म्हणून कर्मचारी संघटना मागणी करत होत्या. 20 हजार बोनससाठी आझाद मैदानात आंदोलनही करण्यात आले. परंतू विरोधी पक्षातील गटनेते उपस्थित नसल्याचे कारण देत आठवडाभरापूर्वी बैठकीत निर्णय घेण्यात आला नव्हता.


सोमवारी पालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाने आयुक्तांना बोलावून बोनस बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी प्रशासनाकडून 12 हजार 500 रुपये बोनस देण्याची तयारी दर्शवली होती. सत्तधाऱ्यांनी मागील वर्षापेक्षा जास्त बोनस देण्यास प्रशासनाला राजी केले आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसमुले पालिकेवर 154.69 करोड़ रुपयांचा बोजा पडणार आहे. बोनसच्या मागील बैठकीला विरोधी पक्षातील गटनेते अनुपस्थित राहिल्याने आजच्या बैठकीला विरोधी पक्षातील गटनेत्यांना बोलावण्यात आले नसल्याचे समजते.

बेस्टकर्मचाऱ्यांना मागीलवर्षी 5 हजार बोनस देण्यात आला होता. त्यात यावर्षी वाढ करण्यात आली असून यावर्षी 5500 रूपये बोनस देण्यात येणार आहे. बोनससाठी बेस्टला 24 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. बेस्टची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने महापालिकेने बेस्टला 1600 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. हे कर्ज 10 टक्के व्याजासह दरवर्षी वसूल केले जाते. मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही 2 ते 3 महिन्याचे व्याज माफ़ करत ही रक्कम बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी वापरली जाणार आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages