3 वर्षात 31 मुंबईकरांचा डेंग्यूने मृत्यु - 2707 रुग्ण दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 October 2016

3 वर्षात 31 मुंबईकरांचा डेंग्यूने मृत्यु - 2707 रुग्ण दाखल

मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत डेंग्यूचे प्रमाण वाढले असून गेल्या 3 वर्षात 31 मुंबईकरांचा डेंग्यूने मृत्यु झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने दिली आहे. 2707 प्रकरणात मृत्युचे टक्केवारी फक्त 1 टक्के आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याकडे मुंबईच्या वार्ड स्तरावर डेंग्यूचे रुग्ण, मृत्युची संख्या याची माहिती विचारली होती. साथरोग विभागाच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी यांनी अनिल गलगली यांस वर्ष 2013 ते 2015 या मागील 3 वर्षाची माहिती दिली आहे. वर्ष 2013 मध्ये बी ,जी दक्षिण, जी उत्तर, के पूर्व, एल, एन आणि टी वार्ड येथे प्रत्येकी 1-1 असे 7 तर पी दक्षिण आणि एम पूर्व येथे प्रत्येकी 2-2 असे सर्व मिळून 11 डेंग्यू रुग्णांनी प्राण गमावले. वर्ष 2014 मध्ये डी, ई, एफ दक्षिण,जी दक्षिण, एच पूर्व, के पश्चिम, एम पूर्व आणि टी वार्ड येथे प्रत्येकी 1-1 असे 8 तर ए आणि के पूर्व येथे प्रत्येकी 2-2 असे सर्व मिळून 12 डेंग्यू रुग्णांनी प्राण गमावले. वर्ष 2015 मध्ये एम पूर्व आणि आर दक्षिण येथे प्रत्येकी 2-2 तसेच डी, एफ उत्तर ,जी दक्षिण, के पश्चिम येथे प्रत्येकी 1-1 असे सर्व मिळून 8 रुग्ण डेंग्युच्या साथीने स्व:ताचे प्राण वाचवू शकले नाही. 3 वर्षात सर्वाधिक रुग्ण ई वार्ड येथे आढळले असून 359 अशी संख्या आहे तर त्यानंतर जी दक्षिण येथे 319 अशी संख्या आहे.

अनिल गलगली यांस वर्ष 2016 या वर्षाची माहिती दिली नसून 3 वर्षात मृत्युचे प्रमाण कमी झाले आहे. महानगरपालिकेने फक्त साथीच्या आजारात याबाबतीत जनजागृती करण्याऐवजी संपूर्ण वर्ष यावर जनजागृती केल्यास शत प्रतिशत डेंग्यूवर नियंत्रण होऊ शकते.

Post Bottom Ad