33 महिन्यात अनधिकृत बांधकामाच्या 70 हजाराहून अधिक तक्रारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 October 2016

33 महिन्यात अनधिकृत बांधकामाच्या 70 हजाराहून अधिक तक्रारी

मुंबई / 16 Oct 2016 - मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या तक्रार क्रमांकावर अनधिकृत बांधकामाच्या तक्रारीची संख्या 70 हजाराहून अधिक असून मुंबई उपनगरातील कुर्ला एल वार्ड अव्वल असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीवरुन समोर येत आहे. विशेष म्हणजे गेल्या 33 महिन्यात 3,39,664 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी अनधिकृत बांधकामाच्या तक्रारीची संख्या 21 टक्के आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडे 1916 या तक्रार क्रमांकावार गेल्या 3 वर्षात प्राप्त तक्रारीची माहिती मागितली होती. आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने अनिल गलगली यांस वर्ष 2014, वर्ष 2015 आणि 1 जानेवारी 2016 पासून 30 सप्टेंबर 2016 अशी 33 महिन्याची माहिती उपलब्ध करुन दिली. मुंबईतील 24 पालिका वार्ड कार्यालयातंगर्त सर्वच खात्याची तक्रारी नागरिक 1916 या क्रमांकावर नोंदवितात. गेल्या 33 महिन्यात 3,39,664 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 3,02,837 तक्रारीचे निवारण झाले आहे आणि 36,647 तक्रारी प्रलंबित आहे.

कुर्ला, गोवंडी आणि चेंबूरच्या सर्वाधिक तक्रारीइमारत व कारखाने खात्याच्या तक्रारी सर्वाधिक आहे. इमारत व बांधकाम खात्याच्या तक्रारीत कुर्ला एल वार्ड कार्यालय नंबर वन आहे. कुर्ला एल वार्ड(15,845), गोवंडी एम पूर्व (9,457) आणि चेंबूर एम पश्चिम(8,068) अशी क्रमवारी आहे.त्यानंतर ए (630), बी (1011), सी (1180), डी (2208),ई (1435), एफ साउथ (657), एफ नार्थ (843), जी नार्थ (1725), जी साउथ (1239), एच ईस्ट (1563), एच वेस्ट (1625),के ईस्ट (3799), के वेस्ट (3193), पी साउथ (2123), पी नार्थ (3731), आर साउथ (2447), आर सेंट्रल (1763), आर नार्थ (1104), एन (1635), एस (1876), टी (1086) अशी क्रमवारी आहे.

अनिल गलगली यांच्या मते मुंबईतील अधिकांश नागरिकांच्या नेहमीच अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी करतात पण पालिका प्रशासनाकडून त्यास दुर्लक्ष केले जाते. यावर तोडगा काढण्यासाठी 'ऑफिसर ऑफ़ मंथली' या धर्तीवर 'बेस्ट वार्ड ऑफिस' किंवा 'वर्स्ट वार्ड ऑफिस' असा नवीन अवार्ड देण्याची सूचना अनिल गलगली यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांस पाठविलेल्या पत्रात केली आहे. जेणेकरुन आत्मग्लानीमुळे 24 वार्ड कार्यालयातील अधिकारी सदविवेकबुद्धिला जागत जबाबदारीने सेवा देतील

Post Bottom Ad