संयुक्त महाराष्ट्रासाठी योगदान देणा-या महापुरुषांचे कार्य प्रेरणादायी - रामदास आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

संयुक्त महाराष्ट्रासाठी योगदान देणा-या महापुरुषांचे कार्य प्रेरणादायी - रामदास आठवले

Share This
मुंबई, दि. 20 : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अमर शेख यांच्यासारख्या अनेकांनी येथील मनामनात क्रांतीची ज्योत पेटवत संयुक्त महाराष्ट्र घडवला. या महापुरुषांचे कार्य येणा-या पिढ्यांसाठी सतत प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे केले.
मुंबई विद्यापीठातील शाहीर अमरशेख अध्यासन आणि लोककला अकादमीतर्फे कलिना येथील कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवनात आयोजित केलेल्या शाहीर अमरशेख जन्मशताब्दी समारोप समारंभ आणि परंपरा महोत्सव 2016 या कार्यक्रमात ते बोलत होते. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. ए. खान, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे, प्रा. प्रकाश खांडगे, डॉ. मोनिका ठक्कर आदी यावेळी उपस्थित होते.

आठवले म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महत्वपूर्ण योगदान देणा-या महापुरुषांच्या कार्याची आठवण ठेवून त्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. वायकर म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्रासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या कार्याची सर्वांनी सतत आठवण ठेवली पाहिजे. भांड म्हणाले की, कलावंत हा आपल्या शब्दांचे शस्त्र बनवून प्रबोधनाचे काम करत असतो. साहित्य हे जीवनाचे मुख्य अंग आहे. त्याच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता व बंधुतेचा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवला पाहिजे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages