पोलिसांत तक्रार दाखल
दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी
मुंबई / प्रतिनिधी 21 Oct 2016
सरकारी कार्यालयातून फायली कागदपत्रे गहाळ होण्याच्या तक्रारी नेहमीच ऐकिवात असतात. परंतू महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखापाल, कार्यकारी अभियंता, वरळी, मुंबई येथील कार्यालयातून एका कंत्राटदाराची बिले त्याला रक्कम अदा करण्यापूर्वीच गायब करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. सरकारी कार्यालयातून बिले गायब करण्यात आल्याची तक्रार कंत्राटदाराने मुंबईच्या वरळी पोलीस ठाण्यात दिली असून बिले गायब करणाऱ्या गायब करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंदवून कारवाईची मागणी केली आहे.

सार्वजनीक बांधकाम विभाग हा नेहमीच भ्रष्टाचारामध्ये अग्रेसर राहिला आहे. दिल्लीमधील महाराष्ट्र सदन आणि माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे या विभागाचे वाभाडे निघत आहेत. या विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाच मुंबईमध्ये सार्वजनिक विभागातून कंत्राटदाराला पैसे देण्याआधीच बिले गायब करण्यात आल्याचा आरोप काकड इंजिनिअर्स ऍण्ड कॉन्ट्रॅक्टरचे मुकुंद काकड यांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने काकड इंजिनिअर्स ऍण्ड कॉन्ट्रॅक्टर या कंत्राटदाराला काम दिले होते. दिलेल्या कामाची पूर्तता झाल्यावर सर्वजणी बांधकाम विभागाच्या उप अभियंता, पूर्व, उप विभाग परेल या कार्यालयाने मोजमाप पुस्तिकेसह देयके कार्यकारी अभियंता, मध्य मुंबई, वरळी यांच्याकडे सादर केली होती. सादर देयकांची छाननी करण्यात आली. सादर देयके लेखापाल यांच्या ताब्यात होती.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनुदान नसल्याने या बिलांची रक्कम अदा करण्यात आली नव्हती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनुदान असल्याने काकड यांनी बिलांची रक्कम मिळण्याची मागणी केली असता त्यांची बिले गहाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. काकड इंजिनिअर्स ऍण्ड कॉन्ट्रॅक्टर या कंपनीला बांधकाम विभागाकडून मिळालेल्या कामाच्या बदल्यात सन २०१२ - २०१३ मध्ये बी १ / सीएमडी / २००, २०१, ७१६, १९६, ३०, ६२,३१,२०४ ही ८ बिले व मोजमाप पुस्तिका गायब करण्यात आल्याने काकड यांना कामाच्या मोबदल्याची रक्कम मिळण्यास दिरंगाई होत आहे. यामुळे काकड यांनी मोजमाप पुस्तिकेसह बिले हरवल्याची तक्रार मुंबईच्या वरळी पोलीस ठाण्यात दिली असून बिले गायब करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंदवून कारवाईची मागणी केली आहे.