५ टक्के आरक्षणाची अमलबजावणी करा - मुस्लिमांची निदर्शने - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

५ टक्के आरक्षणाची अमलबजावणी करा - मुस्लिमांची निदर्शने

Share This
मुंबई 20 Oct 2016 - ५ टक्के आरक्षणाची अमलबजावणी करावी या मागणीसाठी हजारो मुस्लिम बांधवांनी जमीतउला-ए-महाराष्ट्र या संघटनेचे अध्यक्ष हजरत मौलाना नजीम सिद्दिकी आणि सरचिटणीस मौलाना हलीमउल्ला कासीम यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर निदर्शने केली. यावेळी समान नागरी कायद्याला विरोध असल्याचे नोंदवत धरणे आंदोलन करण्यात आले.
मुस्लिमांना आरक्षण मिळायला हवे, मुस्लिम पर्सनल लॉमध्ये ढवळाढवळ करू नये आणि समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करू नये या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार एवढे तत्पर असताना मुस्लिम आरक्षणाबाबत उदासीन का, असा सवाल हजरत मौलाना नजीम सिद्दिकी यांनी केला. तसेच आरक्षणासाठी आरपारच्या लढाईकरिता मुस्लिम समाजाने सज्ज राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages