बेस्टचा ५६५ कोटी तुटीचा अर्थसंकल्प सादर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टचा ५६५ कोटी तुटीचा अर्थसंकल्प सादर

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाचा सन २०१७ - १८ साठी ५६५ . ७४ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी बेस्ट समिती अध्यक्ष मोहन मिठबावकर यांना सदर अर्थसंकल्प सादर केला. बेस्टला सन २०१७- १८ मध्ये ५३८५. कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होणारअसून ६५५१.५८ कोटी रुपयां खर्च अपेक्षित आहे.
बेस्ट उपक्रमामधील विद्यूत पुरवठा विभागाला ४२३२ कोटी रुपयाचे उत्पन्न मिळणार असून ३७७१ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे, बेस्टच्या विद्यूत विभागाला ४६० कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. तर तोट्यात असलेल्या परिवहन उपक्रमांमधून बेस्टला १७५३ कोटी रुपयांचे उत्पन्न्न मिळणार असून २७८० कोटी रुयांचा खर्च अपेक्षीत आहे. बेस्टच्या परिवहन उपक्रमाला तब्बल १०२६ कोटी रुपयांचा तोटा होणार असल्याचे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे.

बस आगारांची पुनर्रचना व बस प्रवर्तनाकरिता एकात्मिक योजना जाणार आहे. आणिक आगार येथे मध्यवर्ती इंजिन पुनस्थापन केंद्र सुरु करण्यात आले आहे. जेएनएनयुआरएम च्या एका माजली बसगाड्यांमधील प्रवाश्यांच्या बसण्याच्या जागेचे पुनर्ररेखन करण्यात आले आहे. वर्षात बस्थानके, बसचौक्या व रोख भरणा केंद्र येथे प्रवाशी, वीजग्राहक, कर्मचारी, व विशेषता ,महिलांसाठी ई प्रसाधनगृहांची तरतूद करण्यात आल्याचे अर्थसंकल्पाचे सादरीकरताना पाटील यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ ला होत असताना या अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांचे लक्ष लागले होते. परंतू यामधून प्रवाश्याना विशेष असे काहीही देण्यात आलेले नाही. तसेच निवडणूक तोंडावर असल्याने भाववाढही करण्यात आलेली नाही.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages