मुंबई / प्रतिनिधी
बेस्टची आर्थिक स्थिती बिकट असून बेस्ट तोट्यात आहे. यामुळे सलग चौथ्या वर्षी बेस्ट कर्मचाऱ्यांना (सानुग्रह अनुदान) बोनस देता येणार नाही अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी दिली.
बेस्ट तोट्यात असताना बेस्टने घेतलेल्या कर्जाचे हफ्ते द्यावे लागत आहेत. महागाई भत्ता वाढल्याने 70 ते 80 करोड़ असलेला खर्च आता 125 करोड़ झाला आहे. बेस्टला टीडीएलआरच्या माध्यमातून मिळणारा महसूल बंद झाला आहे. बेस्टचे होणारे आर्थिक नुकसान कमी व्हावे म्हणून पालिकेकडून अनुदान मागण्यात आले आहे. बेस्टवर आधीच कर्ज असल्याने बेस्टला कर्ज घेणेही परवडणारे नाही यामुळे या वर्षीही बोनस देता येणार नाही असे महाव्यस्थापक पाटील यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देता येत नसल्याचे स्पष्ट केले असताना कामगार संघटनांनी गुरुवारी प्रशासनाबरोबर चर्चा करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

No comments:
Post a Comment