१० ऑक्टोबर नंतर राष्ट्रवादीची खड्डे मोजणे मोहीम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 October 2016

१० ऑक्टोबर नंतर राष्ट्रवादीची खड्डे मोजणे मोहीम

मुंबई,(प्रतिनिधी): मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांवरून सर्व राजकीय पक्षांनी पालिका प्रशासनाला जबाबदार धरण्यास सुरुवात केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी गटनेते धनंजय पिसाळ आणि इतर नगरसेवकांसह आयुक्तांची भेट घेऊन खड्ड्यांबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी पालिका आयुक्तांना खालचे अधिकारी चुकीची माहिती देत असल्याचे निदर्शनास आणले.
आयुक्तांकडून मुंबईत केवळ ३५ खड्डे असल्याचे सांगण्यात येत असले तरी खड्ड्यांबाबत खरी वस्तुस्थिती मुंबईकरांनाही ठाऊक आहे. याच खड्डयांमधून गणपती आले आणि गेलेही तरी खड्डे बुजले नाही नवरात्र संपेल आता काय मुंबईकरांनी खड्ड्यांमध्ये दिवाळी साजरी करायची का असा सवाल त्यांनी केला. 

आयुक्तांनी पावसाचे कारण देत पावसामुळे खड्डे बुजविण्यास अडसर झाल्याचा खुलासा केला. मात्र येत्या १० ऑक्टोबर पर्यंत मुंबईतील रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजविण्याचे आश्वासनं आयुक्तांनी दिल्याचे अहिर यांनी स्पष्ट केले. मात्र १० तारखेनंतर खड्डे न बुजविल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईतील खड्डे मोजण्याची मोहीम सुरु करण्यात येणार असून ही सर्व आकडेवारी आम्ही पालिका आयुक्तांना सादर करणार असल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले. 

दरम्यान, यावेळी पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस बरोबर आघाडी करणार का असे विचारले असता सचिन अहिर यांनी आम्ही समविचारी पक्षबरोबर एकत्र येण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. मात्र दिवाळीपर्यंत काँग्रेसने हात पुढे न केल्यास मुंबईतील सर्व जागा लढविण्यासाठी राष्ट्रवादी तयारी करेल असेही त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS