बृहन्मुंबईतील क्षयरुग्णांना समुदेशनाचा आधार व तंत्रज्ञानाचा समन्वय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बृहन्मुंबईतील क्षयरुग्णांना समुदेशनाचा आधार व तंत्रज्ञानाचा समन्वय

Share This
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षयरोग नियंत्रण संस्थेतर्फे क्षयरोग व औषधप्रतिरोधी (डी. आर टीबी) रुग्णांना मोफत निदान व उपचार या सेवा पुरविल्याजातात. या वर्षी जून २०१६ पर्यंत १२ हजार २३४ क्षयरुग्ण व २ हजार २६१ औषधप्रतिरोधी रुग्ण नोंदविण्यात आले. डी. आर टीबी बाधित रुग्णांना वेळीचसमुपदेशनाद्वारे क्षयरोगाचे निदान, उपचार, प्रतिबंध व रुग्णांनी घ्यावयाच्याकाळजीबाबत माहिती पुरविल्याने क्षयरुग्णास पूर्ण उपचार घेण्यास मदत होते. याकरीता मुंबई क्षयरोग नियंत्रण संस्थेने रूग्णांसाठी समुपदेशन सेवापुरविण्याकरीता केंद्रीय क्षयरोग विभाग (CTD) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार Center for Disease Control (CDC) USA व टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स(TISS) या संस्थांच्या सहकार्याने एक नवीन प्रकल्प ‘सक्षम’ सुरू केला आहे.
याप्रकल्पातंर्गत क्षयरुग्ण व औषध प्रतिरोधी (डी. आर टीबी) रुग्णांना समुदेशनाची सेवापुरविण्यासाठी ४० समुपदेशकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या प्रकल्पातमाहिती तंत्रज्ञानाचा वापर करून क्षयरूग्णांबाबतची प्रत्यक्ष माहिती प्राप्त करतायेईल जेणेकरून त्वरित निर्णय घेता येतील. याकरीता दिनांक ३ ऑक्टोबर, २०१६ रोजी एका खास कार्यक्रमाचे आयोजन करूनत्यात समुपदेशकांना टॅबलेट देण्यात आले आहेत, ज्यामुळे रुग्णांना क्षयरोगाचीमाहिती देण्यास मदत झाली.

या कार्यक्रमास महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजाकेसकर व उप-कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा तसेच या कार्यक्रमासचाळीस क्षयरोग समुपदेशक व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

TISS च्या उपसंचालक प्रोफेसर शालिनी भरत यांनी ह्या कार्यक्रमाच्याउद्घाटनप्रसंगी तंत्रज्ञानाचा वापर अधिक चांगल्या प्रकारे कसा करता येईल याबाबतमाहिती दिली. डॉ. पद्मजा केसकर यांनी माहिती तंत्रज्ञानाबरोबर समुपदेशनाचेमहत्त्व उपस्थितांना पटवून दिले. डॉ. दक्षा शहा यांनी क्षयरोगाबाबत अधिकाधिकमाहितीचा प्रसार जनमानसात करण्यासाठी दृकश्राव्य (Audio Visual) माध्यमाचावापर करण्याबद्दल सांगितले.

TISS व टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टच्या समन्वयाने एक खाससामाजिक उपक्रमसुद्धा सुरू करण्यात येत आहे. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे गोवंडी विभागातील जनतेचा सहभाग घेऊन क्षयरोगाबद्दलजनजागृती करण्यात येत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages