मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचा-यांच्या सुखदुःखात आर्थिकदृष्ट्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहणा-या आणि अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या `दि म्युनिसिपल को.ऑप.बँक लिमिटेड, मुंबई` या बँकेला बँकिंग क्षेत्रातील`बँकिंग फ्रंटीअर्स' या ख्यातनाम प्रकाशनातर्फे ४ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे बँकेचे कार्याध्यक्ष आणि महापालिकेचे उपायुक्त मिलीन सावंत यांना 'सर्वोत्कृष्ट कार्याध्यक्ष' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त `बँकिंग फ्रंटीअर्स' द्वारे पगारदार नोकरांच्या गटातील बँकेला देण्यात येणारे महत्त्वाचे ३ पुरस्कार देखील महापालिका कर्मचा-यांच्याच बँकेने पटकावले आहेत. यामध्ये महापालिकेच्या एटीएम व इतर सुविधांद्वारे तब्बल ६० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याबद्दल 'बेस्ट ऍक्वायरर' पुरस्कार, एटीएम कार्ड द्वारे लक्षणीय व्यवहार झाल्याबद्दल 'सर्वोत्कृष्ट कार्ड पुढाकार' पुरस्कार, अतिशय चांगल्या प्रकारे कोअर बँकिंग पद्धती राबविल्याबद्दल 'सर्वोत्कृष्ट कोअर बँकिंग सर्व्हिस' पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महापालिका कर्मचा-यांच्या बँकेचे कार्याध्यक्ष आणि महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन संबधी खात्यांचे उप आयुक्त मिलिन सावंत यांनी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या एका शानदार समारंभादरम्यान रोजी संपन्न झालेल्या शानदार सोहळ्यात हे पुरस्कार स्वीकारले आहेत.
दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लि. चे पदसिद्ध अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि पदसिद्ध उपाध्यक्ष तथा अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने मोठय़ा प्रमाणातआपल्या कामाचा विस्तार वाढविलेला आहे. या बँकेचे कार्याध्यक्ष तथा उप आयुक्त(अतिक्रमण निर्मूलन) मिलीन सावंत यांनी बँकेचे उत्तमरित्या व्यवस्थापन आणि नियोजन केल्यामुळे सर्वांगीण आर्थिक प्रगतीतही मोठय़ा प्रमाणात वाढ झालेली आहे. दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लि. या बँकेला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई ही महानगरपालिका कर्मचा-यांची बँक असून दिनांक ३१.०३.२०१६ पर्यंत ८७,९४० महापालिका कर्मचारी बँकेचे सभासद आहेत. तसेच ८८८४ नामधारी सभासद आहेत. ही बँक महानगरपालिकेच्या कर्मचा-यांच्या सर्वागीण आर्थिक गरजा भागविण्यासाठी कार्यरत आहे. महापालिका कर्मचा-यास कर्ज सुविधा मुदतीत देत असते. तर नागरिकांसाठी बँकींग सुविधा उत्तमरित्या देत असते. कोअर बँकींग,आर.टी.जी.एस., एन.इ.एफ.टी., पॉस इत्यादी सुविधा बँक देते. बँक रुपे कार्डसची सभासद असून बँकेचे मुंबई व उपनगरात विविध ठिकाणी स्वतःचे ९ ए.टी.एम. केंद्र आहेत. बँकेने मोबाईल पेमेंट सेवा सुरू केली आहे. तसेच या बँकेने एखाद्या खासगी बँकेसारखीच अद्ययावत टेक्नॉलॉजीवर आधारित बँकींग सेवा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहे.

बँकेचा ग्रॉस एन.पी.ए. सन २०१६ मध्ये १.८४ टक्क्यांवरुन १.५४ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे तर निव्वळ एन.पी.ए. शून्य टक्केअसल्याचे बँकेचे असल्याचे महाव्यवस्थापक (प्र.) विनोद रावदका यांनी सांगितले. उत्कृष्ट नियोजन तसेच कर्ज वसुलीसाठी केलेला सततचा पाठपुरावा यामुळे ग्रॉस एन.पी.ए. चे प्रमाण कमी झाले असून बँकेने गेल्या ६ वर्षात चौफेर प्रगती केली असून सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी बँकेस नामांकित असे ४ पुरस्कार प्राप्त झाले असल्याचेही रावदका यांनी सांगितले.