शिवसेनेने पालिका आयुक्तांना घेतले फैलावर - माफिया कोण समोर आणण्याचे दिले आव्हान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिवसेनेने पालिका आयुक्तांना घेतले फैलावर - माफिया कोण समोर आणण्याचे दिले आव्हान

Share This
मुंबई / प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेत दलाल व माफियांचे राज असल्याचा आरोप केला जात आहे. असा आरोप सत्तेत सहभागी असलेल्या भाजपा कडून सत्ताधारी शिवसेनेवर केला जात असल्याने शिवसेनेने महापौरांच्या कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत पालिका आयुक्त अजोय मेहता याना चांगलेच फैलावर घेतले आहे. इतकेच नव्हे तर हे माफिया आणि दलाल कोण आहेत हे नागरिकांसमोर आणण्याचे आव्हान शिवसेनेने दिले आहे.
मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या कार्यालयात शिवसेनेची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत
माजी महापौर व आमदार सुनील प्रभु, खासदार नगरसेवक राहुल शेवाले, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, नगरसेविका किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. यावेळी दलालाच राज नेमके कोणाचे आहे हे आयुकतानी स्पष्ट कराव, माफिया नेमके कोण आहेत हे आता सांगून टाका असे शिवसेनेकडून आयुक्ताना ठणकावण्यात आले आहे. आयुक्तांना फैलावर घेवून शिवसेना शांत बसली नसून माफिया आणि दलालांची नावे समोर आणावी म्हणून महापौरांच्यावतीने पालिका आयुक्तना पत्र देण्यात आले आहे.

मुंबईतील झोपड़यांना कारवाईची नोटिस दिली आहे. झोपड्यावर कारवाई करा अस प्रशासना सांगत आलो आहोत. गेल्या साडेचार वर्षात प्रशासनाने झोपड्यावर कारवाई केली नाही. निवडणुक समोर असताना कारवाई केली जात आहे. सेनेला याचा फटका कसा बसेल हे भाजप बघत आहे. केवळ पालिका निवडणूक डोळ्या समोर ठेऊन सेनेला टारगेट केल जात आहे असे राहुल शेवाले यांनी म्हटले आहे.

सणासुधीच्या दिवसात झोपड्यावर करवाई नको.
गेल्या पाच वर्षात कोणतीही पालिका प्रशासनने कारवाई केली नाही मग आताच कशी कारवाई केली जाते ? यात काही तरी शंका वाटते ? असे प्रश्न उपस्थित करत निवडणुकी पूर्वी झोपड्यावर कारवाई करणे उचित नसल्याचे शेवाले यांनी म्हटले आहे. दरम्यान मुख्यमंत्री आणि भाजपाने मुंबईमधील झोपड्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन शिवसेनेने केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages