सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २१ ऑक्टोबरला आंदोलन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २१ ऑक्टोबरला आंदोलन

Share This
मुंबई : मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्या वतीने २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता महापालिकेच्या वरळी येथील प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन विभाग) यांच्या कार्यालयात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सरचिटणीस सुभाष पवार यांनी दिली.



सॅप प्रणाली रद्द करुन कामगारांचे हाल बंद करावेत, कामगारांना सेवा सुविधानी युक्त चौक्या उभाराव्यात, कामगारांना उच्च प्रतीचे साहित्य पुरवावे, 19 सप्टेंबर 2011 रोजी झालेल्या वेतनवाढीच्या कराराची थकबाकी त्वरीत देण्यात यावी, कामगारांची दर सहा महिन्यांनी वैद्यकीय तपासणी करावी, महापालिका रुग्णालयात उपचारार्थ असलेल्या कर्मचार्‍यांसाठी ओपीडीची स्वतंत्र व्यवस्था करावी, भविष्य निर्वाह निधी लेखापत्राच्या पावतीवर वारसाच्या नावाची नोंद करावी, ठेकेदारी पद्धत बंद करून रिक्त नवीन पदे भरण्यात यावीत, घनकचरा व्यवस्थापनातील कर्मचार्‍यांना इतर विभागातील कामाची सक्ती करण्यात येऊ नये आदी ३९ मागण्यांचे निवेदन संघटनेने प्रमुख अभियंता (घन कचरा व्यवस्थापन) यांना सादर करणार आहे. कामगारांच्या प्रलंबित मागण्याकड़े दुर्लक्ष केले जात असल्याने प्रशासन आणि अधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी 21 ऑक्टोबरला मोर्चा आयोजित केल्याचे सुभाष पवार यांनी सांगितले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages