वांद्रे पश्चिम परिसरात ३ मजल्यांवरील झोपड्यांवर महापालिकेची कारवाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वांद्रे पश्चिम परिसरात ३ मजल्यांवरील झोपड्यांवर महापालिकेची कारवाई

Share This
मुंबई / प्रतिनिधी - वांद्रे पश्चिम परिसरातील महाराष्ट्र नगर क्रमांक २ मध्ये १४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या झोपड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणादरम्यान सुमारे १ हजार झोपड्या या १४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या असल्याचे आढळून आले होते. तर यापैकी ३२० झोपड्या ३ मजले किंवा त्यापेक्षा अधिक मजल्यांच्या असल्याचेही आढळुन आले होते. या झोपड्यांच्या वाढीव बांधकामाबाबत यापूर्वीच नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार आता या झोपड्यांचे वाढीव बांधकाम तोडण्याची कारवाई सुरु करण्यात आली असून आतापर्यंत धोकादायक स्वरुपाच्या २७ झोपड्यांचे वाढीव बांधकाम तोडण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या 'एच पश्चिम' विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली आहे.


महापालिकेच्या परिमंडळ ३ चे उपायुक्त वसंत प्रभू यांच्या मार्गदर्शनात 'एच पश्चिम' विभागाद्वारे आज महाराष्ट्र नगर क्रमांक २ मध्ये अधिक उंचीच्या झोपड्यांच्या वाढीव बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस दलाचे विशेष सहकार्य महापालिकेच्या पथकाला लाभले. या पोलीस दलामध्ये ८ पोलीस कर्मचा-यांचा समावेश होता. तसेच ही कारवाई करणा-या पथकामध्ये महापालिकेच्या १३ कामगार, कर्मचारी व अधिका-यांचा समावेश होता. या कारवाईसाठी १ गॅस कटर, १ कॉन्क्रीट कटर व २ डंपर यांचाही वापर करण्यात आला. ही कारवाई करणा-या महापालिकेच्या 'एच पश्चिम' विभागाच्या पथकामध्ये सहाय्यक अभियंता (परिरक्षण) राजेश यादव, वसाहत अधिकारी सयाजी घाडगे व दुय्यम अभियंता दिनेश भोसले यांचाही समावेश होता.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages