खड्डे बुजविण्याचे डेडलाईन संपली - आयुक्तांनी राजीनामा द्यावा - संजय निरुपम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 October 2016

खड्डे बुजविण्याचे डेडलाईन संपली - आयुक्तांनी राजीनामा द्यावा - संजय निरुपम



मुंबई / प्रतिनिधी 17 Oct 2016
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबईकरांना आश्वासन दिले होते कि, आज म्हणजेच १७ ऑक्टोबर २०१६ पर्यंत मुंबईतील सर्व रस्ते खड्डे मुक्त होतील. मुंबईतील सर्व खड्डे बुजवले जातील व रस्ते चकाचक होतील. पण नेहमी प्रमाणेच यावेळी हि मुंबई महानगपालिकेने मुंबईकरांची निराशा केली. मुंबई महानगरपालिकेची खड्डे बुजविण्याचे डेडलाईन आज संपली, अजूनही मुंबईत सुमारे ४००० खड्डे आहेत. कुठे हि मोठ्या प्रमाणात खड्डे बुजविण्याचे काम होताना दिसलेले नाही. हि मुंबईकरांची थट्टाच आहे. हा मुंबईकरांचा अपमान आहे. महानगर पालिकेच्या आयुक्तांनी ताबडतोब राजीनामा द्यावा व हि मुंबई महानगरपालिका त्वरित बरखास्त करावी, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.


मुंबई महानगपालिका व पालिकेचे आयुक्त खड्ड्यांविषयी गंभिर नाही आहे. हा खूप मोठा रस्ते घोटाळा आहे. पालिकेचे अभियंते व कर्मचारी खड्डे बुजविण्या ऐवजी दादरमध्ये क्रिकेट मॅच खेळत आहेत. पालिकेच्या जी नॉर्थ कार्यालयातील अभियंते व कर्मचारी यांच्यात क्रिकेट मॅच खेळताना आढळले आहेत. आयुक्तांनी रस्त्यांवरील खड्डे बुजलेले नाहीत आणि हे लोक कार्यालय बंद ठेऊन क्रिकेट खेळतात हि अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. याचा मी कडक शब्दात निषेध करतो आहे. अशा अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली पाहिजे असे निरुपम म्हणाले. रस्ते घोटाळ्याला जबाबदार असणारे शिवसेना व भाजपचे नेते, अभियंते, ठेकेदार आणि आयुक्त यांना अटक करावी, अशी मागणी निरुपम यांनी केली आहे.

Post Bottom Ad