
मुंबई 17 Oct 2016 - मुंबईत खड्ड्यांचे राजकारण तापले असताना आणि यावरून खुद्द पालिका आयुक्तांवर अविश्वास ठरावाची टांगती तलवार असताना खड्डे बुजविण्याच्या कामाकडे दुर्लक्ष करून जी उत्तर विभागातील सहाय्यक आयुक्तांसह सर्व अभीयंते आणि कर्मचारी ऑन ड्युटी क्रिकेटचे सामने खेळायला गेल्यामुळे पालिकेत याबाबत उलटसुलट चर्चेला जोर आला आहे. यासंदर्भात पालिका आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर नोंद घेतली असून उपायुक्त आनंद वाघराळकर यांना सदर प्रकरणाबाबत चौकशी करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत .
मुंबईत रस्त्यावर खड्डे पडले आहेत तसेच साथीच्या रोगांनी उच्छाद मांडला असल्याने मुंबईकर हैराण आहेत , खड्ड्यांवरून पालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांकडून थेट आयुक्तांनाच जबाबदार धरत त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरु आहेत, स्वतः आयुक्तांनी खड्डेप्रकरणी युद्धपातळीवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला असताना जी उत्तरचे सहाय्यक आयुक्त आपल्या कर्मचाऱ्यांसह ऑन ड्युटी क्रिकेट सामने खेळण्यास कसे जातात असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता क्रिकेट खेळणाऱ्या या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई करावी , अशी मागणी सर्वत्र होत आहे .
रस्त्यांवरील खड्डेप्रकरणी म न से कडून मुख्य अभियंता संजय दराडे यांनी खड्ड्यांसमोर उभे केल्यामुळे पालिकेतील सर्व अभियंता संघटनांनी तीव्र आंदोलन केले होते , मात्र आज आपले कामकाज सोडून मुंबईकरांच्या पैशातून वेतन घेणाऱ्यांनी ऑन ड्युटी क्रिकेट सामने खेळणे हे कुठल्या तत्वात बसते याबाबत मुंबईकरांचा अपमान नाही का असा सवाल म न से कडून विचारण्यात आला आहे .
सहाय्यक आयुक्तांचे वर्तन नियमभंग
मुंबईकर खड्ड्यांनी आणि साथीच्या रोगांनी त्रासले असताना पालिकेचे सहाय्यक आयुक्तांसह अधिकारी कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनीऑन ड्युटी क्रिकेट सामने खेळावयास जाणे हे अत्यंत चुकीचे आहे. विभागातील जनता आपल्या विविध कामासाठी येत असताना कार्यालयात मात्र कोणी हि हजर नव्हते , मी स्वतः अनेक अधिकाऱ्यांना दूरध्वनी केले ,मात्र कोणी हि फोन उचलले नाही असे प्रभाग समिती अध्यक्ष सुधीर जाधव यांनी याबाबत आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले तसेच सहाय्यक आयुक्तांनी विभागातून बाहेर जाताना प्रभाग समिती अध्यक्षांना कळविणे गरजेचे असते असा नियम आहे परंतु त्यांनी क्रिकेट सामन्यांबाबत आपल्याला कोणतीही कल्पना दिलेली नव्हती असे जाधव यांनी सांगितले .