पालिका कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय नाही - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय नाही

Share This
मुंबई / 15 Oct 2016 - मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा यासाठी आझाद मैदानात दोन दिवस आंदोलन सुरु आहे. शनिवारच्या गटनेत्यांच्या बैठकीत बोनस बाबत निर्णय घेण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र गटनेत्यांच्या बैठकीत विरोधी पक्षातील कोणीही गटनेते उपस्थित नसल्याचे कारण पुढे करत बोनस बाबत कोणतीही चर्चा करण्यात आली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 



मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी १३ हजार ५०० रुपये बोनस देण्यात आला होता. यावर्षी २० हजार बोनस मिळावा अशी मागणी कर्मचारी युनियनकडून केली गेली. त्यासाठी शुक्रवार पासून मुंबईच्या आझाद मैदानात सुरु आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी असलेली गटनेत्यांची बैठक शनिवारी घेऊ आणि याच बैठकीत बोनसचा निर्णय जाहीर करू असे सत्ताधाऱ्यांनी जाहीर केल्याने शनिवारी होणाऱ्या बैठकीकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लागले होते. परंतू गटनेत्यांच्या बैठकीत सत्ताधारी शिवसेना व भाजपा वगळता विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, समाजवादी पक्षाचे गटनेते गैरहजर होते. विरोधी पक्षातील गटनेते गैरहजर असल्याने आम्ही निर्णय घेतल्यास विरोधी पक्षाकडून यावर टिका होण्याची शक्यता असल्याने आम्ही पुढील आठवड्यात पुन्हा बैठक लावून बोनसचा निर्णय घेऊ अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिली आहे. दरम्यान आपल्याला दिलेले आश्वासन सत्ताधाऱ्यांनी पाळले नसल्याने कर्मचारी युनियन व कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. आम्ही आमचे आंदोलन स्थगित करायचे कि सुरूच ठेवायचे हा निर्णय आम्ही सगळे बसून घेऊ अशी माहिती युनियन पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages