मुंबई दि. 24 ऑक्टोबर 2016
वीर जिजामाता उद्यानातील पेंग्वीनचा मृत्यू ही बालहट्टापायी राजरोस झालेली हत्या असून या प्रकरणी महापालिका विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
मुंबईच्या वातावरणात पेंग्वीन तग धरू शकणार नाहीत की नाही याबाबाबत शंका असतानाही बालहट्टापायी महापालिकेने 25 कोटी खर्च करून पेंग्वीन पक्षी आणले आणि त्यांच्या निवा-यासाठीही कोट्यावधी रूपये खर्च यातल्या एका पक्षाचा मृत्यू झाला केले. महानगरपालिकेने 63 कोटी रूपये खर्च केले यात मुंबईकरांच्या पैशाचा अपव्यय तर झालाच आहे पण निष्पाप मुक्या प्राण्यांच्या जीवाशी महापालिकेने खेळ मांडला आहे. या संपूर्ण प्रकाराला जबाबदार असणा-या महापालिकेविरोधात Prevention Of Cruelty Against Animals Act 1960 या व अन्यकायद्यानुसार व तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment