प्राणिसंग्रहालयास भेट देणाऱया नागरिकांना २७ ऑक्टोबर, २०१६ पासून “अतिरिक्त आयुक्त बंगला” प्रवेशद्वारामधून प्रवेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 October 2016

प्राणिसंग्रहालयास भेट देणाऱया नागरिकांना २७ ऑक्टोबर, २०१६ पासून “अतिरिक्त आयुक्त बंगला” प्रवेशद्वारामधून प्रवेश

ई. एस. पाटणवाला मार्गावर वाहने उभी करण्याची पर्यायी व्यवस्था
मुंबई / प्रतिनिधी - भायखळा येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या आधुनिकीकरण प्रकल्प अंतर्गत उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या मुख्य प्रवेद्वाराजवळील “एन्ट्री प्लाझाच्या” विकासाची कामे महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहेत. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील मुख्य प्रवेशद्वारामधून नागरिकांना प्रवेश देण्यात येतो. सदर कामांमुळे नागिरकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सदर एन्ट्री प्लाझाची विकासकामे पूर्ण होईपर्यंत सर्व अभ्यागतांना आगमन – निर्गमनासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून ई. एस. पाटणवाला मार्गावरील “अतिरिक्त आयुक्त बंगला” प्रवेशद्वारामधून गुरुवार, दिनांक २७ ऑक्टोबर, २०१६ पासून प्रवेश देण्यात येणार आहे. अभ्यागतांची वाहने उभी करण्यासाठीची व्यवस्था ई. एस. पाटणवाला मार्गावर करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन पर्यायी व्यवस्थेचा वापर करावा, असे महापालिका प्रशासनातर्फे कळविण्यात येत आहे.

Post Bottom Ad