खड्यांमध्ये उभे केल्याने पालिका अभियांत्यांचे काम बंद आंदोलन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खड्यांमध्ये उभे केल्याने पालिका अभियांत्यांचे काम बंद आंदोलन

Share This
तर 10 दिवसांनी आयुक्तांनाही खड्ड्यात उभे करू - संदिप देशपांडेमुंबई / प्रतिनिधी - मुंबई शहरातजागो जागी पडलेल्या खड्यांमुळे मनसेने मुख्य अभियंता रस्ते विभाग यांना खड्ड्यात उभे करून या खड्ड्याना मीच जबाबदार हातात दिल्याने पालिकेच्या अभियंत्यांनी गुरूवार पासून काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ज्या मुंबईकरांच्या करामधून पगार घेतला जातो त्या सामान्य नागरिकांना वेठीस धरले जाणार आहे. तर 10 दिवसात खड्डे न बुजवल्यास आयुक्तांनाही खड्ड्यात उभे करू असा इशारा मनसेचे गटनेते संदिप देशपांडे यांनी दिला आहे.
मुंबईमधील रस्त्यावरील खड्डे ७ दिवसात बुजवा अन्यथा मुख्य अभियंत्यांना खड्ड्यात उभे करू असा इशारा मनसेचे संदिप देशपांडे यांनी दिला होता त्याप्रमाणे आपल्या विभागातील खड्डे दाखवण्याच्या बहाण्याने मुख्य अभियंता संजय दराडे यांना खड्ड्यात केले होते यामुळे पालिकेच्या अभियंत्यांनी गुरुवारी पालिका आयुक्तांची भेट घेवून राजीनामे देण्याचा प्रयत्न केला असता आयुक्तांनी राजीनामे स्विकारण्यास नकार दिल्याने जो पर्यंत संदिप देशपांडे व नगरसेवक संतोष धुरी यांना जो पर्यंत अटक केली नाही तो पर्यंत काम बंद करण्याचा निर्णय अभियंता संघटनेने घेतला आहे.

दरम्यान संदिप देशपांडे यांनीही पत्रकार परिषद घेवून पालिकेला १० दिवसाचा कालावधी दिला आहे. येत्या १० दिवसात खड्डे न बुजवल्यास पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्ताना खड्ड्यात उभे करण्याचा इशारा देशपांडे यानी दिला आहे. खड्ड्यांमुळे जगात मुंबईची मान खाली गेली आहे. शहरात खड्डे पडले असताना अभियंत्यांना लाज कशी वाटत नाही असा प्रश्न देशपांडे यांनी केला आहे.

अभियंत्यांनी आमच्या अटकेची तसेच आमचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली आहे. आम्हाला अटक केल्यास मुंबईमधील खड्डे जो पर्यंत बुजवले जाणार नाहीत तो पर्यंत जामिन घेणार नसल्याचे देशपांडे यांनी सांगितले. आम्हाला लोकांनी निवडून दिले असल्याने लोकच आम्हाला घरी बसवण्याचा निर्णय घेव़ू शकतात मुख्यमंत्र्यांच्या मर्जिने आलेले आयुक्त हां निर्णय घेवु शकत नाही असा टोला देशपांडे यांनी लगावला आहे. आमच्या राजिनाम्यामुळे जर मुंबईमधील खड्डे बुजवणार असतील तर आम्ही दोघे राजीनामेही देवू असे देशपांडे यांनी म्हटले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages