रूग्णालयांकडून सहकार्य न मिळाल्यास 108 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 November 2016

रूग्णालयांकडून सहकार्य न मिळाल्यास 108 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

मुंबई : सर्व खाजगी रूग्णालयांनी तातडीच्या उपचारा प्रंसगी रूग्णांकडून धनादेश स्वीकारण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबत काटेकोर अमंलबजावणी व्हावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिका-यांकडून सनियंत्रण केले जाणार आहे. रुग्णांना खाजगी रूग्णालयाकडून सहकार्य न मिळाल्यास त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी 108 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
रुग्णांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी संबधीत रूग्णालयातील जबाबदार व्यक्तीचा दूरध्वनी किंवा मोबाईल क्रंमाक घ्यावा जेणेकरून त्यांना धनादेश स्विकारण्याबाबत मदत होईल. त्याचबरोबर एखादया रूग्णाने उपचार घेतलेल्या रूग्णालयास दहा हजार रूपयांपर्यंतचा दिलेला धनादेश न वटल्यास या धनादेशाची प्रतिपूर्ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्याचा निर्णयही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

Post Bottom Ad