महापालिका नाल्यांवर 149 कोटी रुपये खर्च करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिका नाल्यांवर 149 कोटी रुपये खर्च करणार

Share This
घाटकोपरमधील नाल्यांसाठी 107 कोटीमुंबई / प्रतिनिधी - 8 Nov 2016
मुंबईमधील पाणी साचण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी नाल्यांची दुरुस्ती व रुंदीकरण करण्याचे काम मुंबई महापालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे यासाठी 149 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यापैकी घाटकोपरसाठी 107 कोटी रुपये तर टी, एस, आर मध्य वार्डमधील नाल्यांवर 42 कोटी 95 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. तसे प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात आले आहेत.
मुंबईच्या घाटकोपर एन वार्डमधील नाल्यांवर 107 कोटी रुपये खर्च केले जाणार असून यामधील सेन्ट्रल रेलवे ते घाटकोपर अँधेरी जोड़मार्गपर्यंत नाला पेटीकांची पुनर्बांधनी केली जाणार आहे त्यासाठी 8 कोटी 19 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. नायडू कॉलनी पासून वल्लाभाग नाला वळवण्यासाठीे व रुंदीकरनासाठी 19 कोटी 71 लाख रुपये खर्च केले जाणार आहे. सेन्ट्रल रेलवे ट्रयाक पासूनचा लक्ष्मीबाग़ नाला वळवण्यासाठीे व रुंदीकरनासाठी 5 कोटी 67 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. सोमय्या नाला वळवण्यासाठीे व रुंदीकरनासाठी 43 कोटी 67 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. बर्वे नगरचा नाला रुंदीकरण व सुधारणा यासाठी 14 कोटी 44 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. कामराज नगर येथील पर्जन्य जलवाहिन्यांचे बांधकाम करण्यासाठी 15 कोटी 30 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

मुलुंड टी वार्ड नीलम नगर येथील रेलवे कल्व्हर्ट ते गुज्जर मार्गापर्यंत मार्गावरील बोंड्री नाल्याच्या भिंतिचे काम करण्यासाठी 5 कोटी 17 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. एस विभागातील कांजुर नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यासाठी 33 कोटी 3 लाख रुपये तर आर मध्य वार्डमधील छोट्या नाल्यांची दुरुस्तीकरण व बांधकामासाठी 4 करोड़ 74 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या सर्व कामाचे प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात आले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages