500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 November 2016

500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद

नवी दिल्ली, दि. 8 Nov 2016 - देशात वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016 पर्यंत 50 दिवसांच्या कालावधीत नागरिकांना 500 आणि 1000च्या नोटा पोस्टात किंवा बँकेत जमा करता येणार आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.

लवकरच 500 आणि 2000च्या नव्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चलनात आणणार आहे. ज्यांना 500 आणि 1000च्या नोटा 30 डिसेंबर 2016 पर्यंत जमा करता येणार नाहीत त्यांना 31 मार्च 2017 पर्यंत आयडी प्रूफसह नोटा जमा करण्याची मुदतवाढ दिली आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रुग्णालयात नोव्हेंबर 2011पर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. रेल्वे, बस आणि विमानतळाच्या तिकीट काऊंटरवर या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. देशात दहशतवाद आणि बनावट नोटांमुळे भ्रष्टाचार वाढत आहे. 500 ते 1000 च्या नोटांचा वापर 80 ते 90 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. दहशतवाद आणि बनावट नोटांच्या विरोधात लढाई उभारायला हवी. भ्रष्टाचा-यांकडून सव्वा लाख कोटी रुपयांचा काळा पैसा बाहेर आला आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. दहशतवाद आणि बनावट नोटांच्या माध्यमातून भ्रष्टाचार सुरू आहे, असंही ते म्हणाले आहेत.

-1 हजार आणि 500 रूपयांच्या नोटा 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत बदलता येणार
-10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत पोस्ट ऑफिस किंवा बॅंकांमध्ये 1 हजार आणि 500 रूपयांच्या नोटा जमा करा
-10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत आधारकार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड दाखवून नोट बदलू शकता
-चेक, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे होणारे व्यवहार सुरळीत असणार, त्यावर निर्बंध नाही
-500-1000च्या नोटांच्या सहाय्याने महत्वाच्या ठिकाणी व्यवहार करण्यासाठी 11 नोव्हेंबरपर्यंत मुदत
-रूग्णांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर 500-1000च्या नोटांवर व्यवहार करता येणार, औषधे मिळतील
-2000 च्या नव्या नोटांचा प्रस्ताव स्वीकारला आहे, 500 आणि 2000 च्या नवीन नोटा येणार
-100, 50, 20, 5, 2 आणि 1 रूपयाच्या नोटचं मोल तसंच राहणार


लवकरच येणार 2 हजारांची नोट
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच 2 हजार रुपयांची नोट चलनात आणणार आहे. चलनात येणा-या 2000च्या नवीन नोटांमध्ये जीपीएस बसवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हैसूरमधल्या चलन छपाई कारखान्यातील मशिनमधून या नोटा छापण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. देशातील सर्व मोठ्या उद्योगसमूहांना सुरुवातीच्या काळात या नोटा चलन म्हणून वापरात आणण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत. या वृत्ताला केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून दुजोरा मिळाला आहे.

अर्थ मंत्रालय आणि सुरक्षा प्रींटिंग इंडिया लिमिटेड कॉर्पोरेशन (एसपीएमसीआईएल) यांच्या मालकीच्या कंपनीच्या माध्यमातून या नोटा छापण्यात येणार आहेत. मध्य प्रदेशमधील देवास आणि महाराष्ट्रातील नाशिकमध्ये 40 टक्के नोटा छापल्या जाणार आहेत. तर उर्वरित नोटा मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि नोएडाच्या छपाई कारखान्यात छापण्यात येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2014-15 या आर्थिक वर्षात 500 आणि 1000च्या जवळपास 86 टक्के नवीन नोटा छापून चलनात आणल्या आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार बोकाळला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता नव्या नोटांची अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Post Bottom Ad