पालिकेच्या देवनार डंपिंगवर देखरेखीसाठी ११ उंच टेहळणी मनोरे पालिका बांधणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 November 2016

पालिकेच्या देवनार डंपिंगवर देखरेखीसाठी ११ उंच टेहळणी मनोरे पालिका बांधणार

मुंबई ( प्रतिनिधी ) - सतत लागणा-या आगीमुळे नेहमीच चर्चेत असणारे पालिकेचे महत्वाचे देवनार डंपिंग ग्राऊंडवर आता देखरेखीसाठी आता ११ उंच टेहळणी मनोरे बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी ८५ लाख ५७ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. या मनो-यांमुळे डंपिंगवरील अंतर्गत हालचालींवर सुरक्षा रक्षकांमार्फत देखरेख ठेवणे सोयीच ठरणार आहे. शुक्रवारच्या स्थायी समितीत हा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
देवनार डंपिंग ग्राऊंडवर अनेकवेळा लागलेल्या आगीमुळे मोठया प्रमाणात वातारण प्रदुषीत होऊन नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात २००९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली हेाती. न्यायालयाने सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात निर्देश देऊन पाच सदस्यीय समिती गठित करण्याचे आदेशही दिले होते. देवनार कचरा भराव भूमीच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश देत पाच सदस्यीस सर्वेक्षण तथा देखरेख समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ ६ यांची देवनारच्या सुरक्षेकरता नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसारच पोलिसांनी देवनार डंपिंगवर टेहळणी मनोरे बांधण्यासाठी महापालिकेने कळवले आहे. त्यानुसारच पालिकेने हा निर्णय घेतला आहे. यासाठी मे जोशी कन्सल्टंट यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. सुमारे २४० मीटर अंतराने ११ उंच मनोरे बांधण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार या कामासाठी अनास इन्फ्रा या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

Post Bottom Ad