हयातीचा दाखला सादर करण्यासाठी 15 जानेवारी 2017 पर्यंत मुदत वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 November 2016

हयातीचा दाखला सादर करण्यासाठी 15 जानेवारी 2017 पर्यंत मुदत वाढ

मुंबई दि. 18 : केंद्र शासनाच्याधर्तीवर आता सर्व राज्य शासकीय निवृत्तीधारकांना त्यांचा हयातीचा दाखला सादर करण्याची मुदत दि. 15 जानेवारी 2017 पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

महाराष्ट्र कोषागार नियमाप्रमाणे निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत हयातीचा दाखला देणे बंधनकारक असते. हा हयातीचा दाखला मुख्यत: संबंधित निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेतात, त्या बँकांमार्फत संबंधित कोषागारास सादर केला जातो. यावर्षी ही मुदत 30 नोव्हेंबर 2016 अशी होती. केंद्र शासनाने 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा वापरास बंदी केल्याने व त्या नोटा बँकांमध्ये बदलून देण्याची किंवा भरण्याची व्यवस्था केल्याने बँकांमध्ये गर्दी वाढली आहे. बँक कामकाजावर ताण निर्माण झाला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन राज्यात देखील हयातीचा दाखला सादर करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

हे आदेश अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे, जिल्हा परिषदेचे निवृत्तीवेतनधारक यांनाही लागू राहतील अशी माहिती वित्तमंत्र्यांनी दिली असून यासंबंधीचा शासननिर्णय आज वित्त विभागाने निर्गमित केला आहे. त्याचा संकेतांक201611181443531905 असा आहे.

Post Bottom Ad