जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण सोडत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 November 2016

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण सोडत

मुंबई, दि. 18 : राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आज राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मंत्रालयात सोडत काढण्यात आली. विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी. पत्रकार यांच्या उपस्थितीत चिठ्ठ्या टाकून ही सोडत काढण्यात आली. यावेळी ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता, उपसचिव गिरीश भालेराव यांच्यासह ग्रामविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची सोडत शुक्रवार दिनांक 10 जून 2016 रोजी काढण्यात आली होती. पण सोलापूर आणि लातूर या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी लागोपाठ दोनदा अध्यक्षपद आरक्षीत झाल्याने सर्वसाधारण प्रवर्गातील सोडतीमध्ये सुधारणा करावी, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने PIL NO. 85/2016 मध्ये दिले होते. त्यानुसार आज राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी नव्याने सोडत काढण्यात आली.

10 जून 2016 रोजी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील सोलापूर आणि लातूर या जिल्हा परिषदा लागोपाठ दोनदा महिलांसाठी आरक्षित झाल्या होत्या. त्यामुळे आजची सोडत काढताना मागील वेळी महिलांसाठी आरक्षीत असलेले सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि लातूर हे जिल्हे वगळून सर्वसाधारण पदासाठी असलेल्या उर्वरीत जिल्ह्यांमधून महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले. सद्यस्थितीत वाशिम जिल्हा परिषद ही सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) साठी आरक्षित असल्याने व वाशिम जिल्हा परिषदेचा कार्यकाल जून 2016 मध्ये सुरु झालेला असल्याने आजच्या सोडतीत वाशिम जिल्हा परिषदेलाही वगळण्यात आले. त्यानुसार उर्वरीत 11जिल्ह्यांमधून सर्वसाधारण पदांमधून महिलांसाठी आज मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते चिठ्ठ्या टाकून सोडत काढण्यात आली.

आजच्या सोडतीत 11 जिल्ह्यांमधून 4 जिल्हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी व 7 जिल्हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षीत करण्यात आले आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठीच्या एकूण 16जिल्ह्यांचे विवरण पुढील प्रमाणे आहे. -

सर्वसाधारण प्रवर्ग – कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, अहमदनगर, जालना, चंद्रपूर, सातारा.

सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) – वाशिम, बीड, गडचिरोली, रत्नागिरी,नांदेड, सिंधुदूर्ग, रायगड, नाशिक.

हे आरक्षण (वाशिम जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाल सर्वसाधारण (महिला) सुरु असल्याने वाशिम वगळून) राज्यातील उपरोक्त जिल्हा परिषदांचा सध्याचा आरक्षणाचा कालावधी संपल्याच्या लगतच्या दिनांकापासून लागू राहील. उर्वरीत जिल्ह्यांचे आरक्षण 10जून 2016 रोजी निश्चित झाल्यानुसार कायम असेल.

Post Bottom Ad