राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त 16 नोव्हेंबरला कार्यशाळेचे आयोजन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त 16 नोव्हेंबरला कार्यशाळेचे आयोजन

Share This
मुंबई, दि. 11 : प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचा स्थापना दिन 16 नोव्हेंबर असून हा दिवस राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिनाच्या औचित्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने पत्रकार, जनसंपर्क अधिकारी, माहिती अधिकारी यांच्यासाठी दि. 16 नोव्हेंबर रोजी मंत्रालयातील मिनी थिएटर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा प्रसारमाध्यम प्रतिनिधी, जनसंपर्क अधिकारी आणि माध्यम अभ्यासकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले आहे.

16 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.00 वाजता आयोजित या कार्यशाळेत ‘दैनिक जनशक्ती’चे संपादक आणि ‘टेक वार्ता’ चे कार्यकारी संपादक शेखर पाटील ‘नव्या माध्यमांची आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेस मुंबईतील पत्रकार, विविध संस्थांचे जनसंपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार आहेत. सोशल मीडियासह नव्या माध्यमांचा संज्ञापनासाठी वापर, समूह संवाद आदी विविध विषयांची यावेळी माहिती देण्यात येणार आहे. विविध माध्यमांतील पत्रकार, जनसंपर्क अधिकारी आणि माहिती- जनसंपर्क अधिकारी यांच्यासह माध्यमांच्या अभ्यासकांनीही या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages