टोल सवलत 18 नोव्हेंबर पर्यंत - एसटीमधून विनाशुल्क भाजीपाला वाहतूक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

टोल सवलत 18 नोव्हेंबर पर्यंत - एसटीमधून विनाशुल्क भाजीपाला वाहतूक

Share This
मुंबई दि.14 Nov 2016 : 
500 आणि 1000 च्या जुन्या चलनी नोटा बाद करण्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना एसटीमधून भाजीपाला विनाशुल्क नेण्यासाठी परवानगी देण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसयांनी दिले असून मुंबईसह राज्य महामार्गावरील टोल सवलतीची मुदत येत्या 18 तारखेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या ‘वर्षा’ या निवासस्थानी विविधविभागांच्या सचिवांची एक बैठक घेऊन त्यात 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. विविध सचिव आणि रिझर्व्ह बँकेचे अधिकारी यांच्याशी त्यांनी यावेळी सविस्तर चर्चा केली. एसटी बसेसमधून प्रत्येक शेतकऱ्याला 50 किलोपर्यंत भाजीपाला कोणतेही शुल्क न आकारता नेऊ देण्यास एसटी महामंडळाने परवानगी देण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. येत्या 24 नोव्हेंबरपर्यंत ही सवलत लागू असेल.यामुळे शेतकऱ्यांना आपला माल प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचविता येणार असून,त्यातून त्यांच्या मालाला चांगली किंमत सुद्धा मिळेल. मुंबईसह राज्य महामार्गावरील टोलसवलत 18 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यानी दिले. याशिवाय बॉर्डर चेकपोस्टवर दंड आणि प्रलंबित देणी 500 आणि 1000 रूपयांच्या जुन्या नोटांमधून देता येतील असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील सर्व विद्यापीठांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क/शैक्षणिक शुल्क इत्यादी शुल्क हे धनाकर्षाऐवजी (डीडी/पेऑर्डर) धनादेशाने स्वीकारावेत,असा निर्णय घेण्यात आला आहे. यात महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पॉलिटेक्निकचासुद्धा समावेश असेल. यातून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, बँकांवरील ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे. स्कूलबस ऑपरेटर्सशी संबंधित अधिकाऱ्यांनी चर्चा केली असून, त्यांनी संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. मोठ्या शहरांमध्ये आणि राज्यातील दुर्गम भागात मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून नोटा बदलून देण्यासाठी बँकांनी सामान्य नागरिकांना मदत करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बँकांच्या प्रतिनीधींनासांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages